डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आंबडवे ला निर्माण करणार
मुंबई / रत्नागिरी :-
"भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे या मूळ गावी प्रत्येक भारतीयांच्या मनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक होणार असल्याची घोषणा आज मंत्रालयातून करण्यात आली आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली असल्याची" माहिती मंत्री योगेश कदम यांनी दिली.
"स्मारकाचा प्रारूप आराखडा लवकरच तयार होणार असून, ३५ गुंठे जागेत या मुख्य स्मारकाची निर्मिती पहिल्या टप्प्यात होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा संपूर्ण स्मारक परिसर भविष्यात जवळपास ९ एकर जागेवर विकसित करण्यावर सरकारचा भर आहे." असे योगेश कदम म्हणाले.
"स्थानिक ग्रामस्थांच्या मागण्यांना लक्षात घेता, त्यावर. भूसंपादन प्रक्रिया सरकार तर्फे राबवली जाणार असून, स्मारकाच्या जागे वरील 34 घरांचे पुनर्वसन स्मारक जवळील जागेत करण्यात येणार आहे. त्यास सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाठ यांनी मंजुरी दिली असून, भूसंपादन प्रक्रियेला वेग येण्यासाठी खरेदीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले, यामुळे भूसंपादन कालावधी कमी होणार असून, स्मारक उभारणीला गती मिळणार असल्याचे" मंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
या बैठकीत सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षवर्धन कांबळे, दूरदृश्य प्रणालीद्वारे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, इतर संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते. अशी माहिती मंत्री योगेश कदम यांनी एक्स वर पोस्ट करत दिली.


0 टिप्पण्या