Hot Posts

6/recent/ticker-posts

"रक्षाबंधनाच्या सणात एसटी ला १३७ कोटींचा फायदा" "मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती"


रक्षाबंधन सणा निमित्त एस टी ला १३७ कोटींचा फायदा परिवहन मंत्री यांनी दिली माहिती.


मुंबई:- 

 कुठल्या ना कुठल्या निमित्याने आपण आपल्या नातेवाईकांच्या घरी जाणें येणे करतच असतो. अशातच रक्षाबंधन उत्सव पार पडला. या सणनिमित्त भाऊ बहिणीच्या घरी किंवा बहीण भावाच्या घरी येत असते आणि बहीण भावाला ओवाळून राखी बांधत असते. यावर्षीही याच सणा निमित्याने ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान डच्च भरलेल्या प्रवाश्यांमुळे एस टी महामंडळाला १३७.३७ कोटी रुपयांचे नफा झाला असून, 11 ऑगस्ट ला 39 कोटींचे उत्पन्न मिळाले. यावेळेची ही एस टी महामंडळा साठी विक्रमी उत्पन्न मिळाले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक  यांनी दिली.







 पुढे म्हणाले, "यावर्षी सुध्दा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एस टी ने प्रवाश्यानी मोठ्या प्रमाणात प्रवास केला. रक्षाबंधन च्या एका दिवसा आधी ८ तारखेला ३०.०६ कोटी, तर रक्षा बंधनाच्या दिवशी ०९ तारखेला ३४.८६ कोटी१० तारखेला ३३.३६ कोटी.  तर ११ तारखेला जवळपास ३९.०९ कोटी विक्रमी उत्पन्न   एस टी ला मिळाले असून, ०८ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान  एस टी ने १ कोटी ९३ लाख प्रवाश्यानी सुखरूप प्रवास केला आहे.   तर, जवळपास ८८ लाख महिलांनी  रक्षाबंधनाच्या दिवशी प्रवास केला"  

   "दरवर्षी एस टी महामंडळाला रक्षा बंधन आणि भाऊबीज या दिवशी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते. भाऊ किंवा बहीण एकमेकांकडे जात असतात. त्यामुळे दळण वळण प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळेच एस टी ला प्रत्येक वर्षी विक्रमी उत्पन्न मिळत असते" अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. 

   रक्षाबंधन सणा निमीत्त इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रवाशांचे आभार मानले असून, एस टी कर्मचाऱ्यांचे देखील अभिनंदन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. 









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या