Hot Posts

6/recent/ticker-posts

"रेशन दुकानदारांच्या कमिशन मध्ये वाढ" , "नेमकं किती रुपयांची सरकारने केली वाढ", "घ्या जाणून"

 

रेशन दुकानदारांना आता मिळणार क्विंटल मागे 170 रुपये मंत्रिमंडळातील महत्त्वपूर्ण निर्णय.



मुंबई:- 


राज्य शासाच्या वतीने महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्यांना शिधापत्रिका धारकांना अन्न धान्य आणि काही जीवनावश्यक वस्तूंचे दरमहा सार्वजनिक वितरण व्यवस्थापन व्दारे रेशन दुकानदार यांच्या तर्फे वाटप करत असते. अशातच राज्य मंत्रिमंडळाने रास्त भाव दुकान दारांच्या कमिशनमध्ये क्विंटल मागे 20 रुपयांची वाढ केली असून, क्विंटल मागे आता रेशन दुकानदार यांना 170 रुपये मिळणार असल्याची घोषणा  राज्य सरकारने केली आहे. अशी माहिती "माहिती व जनसंपर्क महासंचालनालय" यांच्या एक्स अकाउंट ने दिली. या  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. 




     राज्य शासना तर्फे दुकानदारांना १०५ रुपये आणि केंद्र शासना तर्फे ४५ रुपये कमिशन देण्यात येत होते. तर आता राज्य शासनाच्या वतीने २० रूपये कमिशन वाढ म्हणून प्रति क्विंटल वर देण्यात येणार असल्याचे शासन तर्फे जाहीर झाले आहे. राज्य शासनाला बऱ्याच दिवसां पासून अनेक रेशन दुकानदारां च्या संघटनेने कमिशन वाढी संदर्भात मागणी केली होती. आता ती मागणी मंजूर झाली असून, राज्यातील जवळपास ५४००० दुकानदारांना याचा फायदा होणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या