Hot Posts

6/recent/ticker-posts

"राज्यात तब्बल १५००० पोलिसांची होणार भरती" "मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय"



राज्यात पोलीस भरती साठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकांसाठी मंत्रिमंडळाने १५००० पोलीस भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 


पोलीस भरती २०२४-२०२५ :- 

 रााज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. राज्य शासना तर्फे १५००० पोलीस दलात भरती करण्यास शासनाने मंजुरी दिली असून, राज्यातील पोलीस दला मधील शिपाईचे  १५,००० पद भरली जाणार आहे. वर्ष २०२४ ते २०२५ या कालावधीतील ही भरती होणार आहे. विशेष बाब म्हणजे  २०२२-२०२३ मध्ये संबंधित पदाची वयोमर्यादा ओलांडलेले व्यक्ती सुद्धा  यावेळी अर्ज करू शकतात. अशी माहिती महाराष्ट्र DGIPR यांनी एक्स वर दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 



विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले होते की, पोलिसांचे सक्षमीकरण करण्या करीता २०२२ ते २०२५ या तीन वर्षा च्या दरम्यान ३८,८०२ पोलिसांची भरती केलेली होती, तर राज्यात १३,५६० पोलीस भरतीचा प्रस्ताव आणलेला आहे". असा सूतोवाच त्यांनी केला होता. लवकरच सरकार १५००० पोलीस भरतीची तारीख जाहिर करणार आहे.

       शहरी गृहराज्य मंत्री योगेश कदम म्हणाले 

"२०२१-२०२२दरम्यान १७००० पोलीस दलाची भरती सरकारने केली, २०२२-२०२३ ला १८००० पोलिसांची भरती प्रक्रिया राबवली आहे. तर या वर्षी १५००० पोलीस भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. 5 वर्षांमध्ये केली जाणारी ही रेकॉर्ड ब्रेक भरती असून, जितक्या जागा रिक्त आहेत तितक्या रिक्त जागा भरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय एतिहासिक असल्याचा" दावा त्यांनी केला.  

    गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या पदरी भरती होत नसल्याने निराशा येत होती. परंतु आता ती निराशा मिटलेली असून, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मनात आशेचे किरण अजून जीवंत ठेवून भरती साठी तयारी करतील आणि विद्यार्थी जोमाने कामाला लागतील ही अपेक्षा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या