उन्नाव बलात्कार प्रकरण! "कुलदीप सिंह सेंगर चा जामीन स्थगित" सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय!



उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपीला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केली होती. त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले होते. त्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आरोपीस मंजूर केलेली जामीन सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 









दिल्ली उच्च न्यायालयाने उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर जामीन मंजूर केल्याने देशभरातून आक्षेप नोंदवण्यास सुरुवात झाली होती. अशातच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर  दिल्ली उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामीन ला स्थगिती दिली आहे. 










 सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. उच्च न्यायालयाच्या आदेशा विरुद्ध केंद्रीय अन्वेषण ब्युरोने दाखल केलेल्या याचिकेवर कुलदीप सिंह सेंगर ला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेंगरला तुरुंगातून सोडले जाऊ नये, असा आदेशही सर्वोच्च न्यायलयाने दिला. 




                  
            सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?



     " प्रतिवादी दुसऱ्या एका प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम ३०४ भाग २ अंतर्गत दोषी सिद्ध झाला आहे, म्हणून त्याला शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आरोपी या प्रकरणात कोठडीत आहे. ही विशिष्ट परिस्थिती लक्षात घेऊन, आम्ही वादग्रस्त निर्णयाच्या अंमलबजावणीला स्थगिती देत आहोत. आरोपीला कोठडीतून सोडले जाणार नाही." असे न्यायालय म्हणाले

"पीडितेला स्वतंत्र विशेष परवानगी याचिका (SLP) दाखल करण्याचा वैधानिक अधिकार आहे. त्यासाठी तिला सर्वोच्च न्यायालया कडून परवानगीची आवश्यकता नाही.  तिला मोफत कायदेशीर मदतीची गरज पाहिजे असल्यास सर्वोच्च न्यायालय विधी सेवा समिती तिला मोफत कायदेशीर मदत पुरवेल. ती  स्वतःच्या वकीला द्वारे देखील तिचे अपील दाखल करू शकते", असेही न्यायालय म्हणाले. 


    आरोपीला पोक्सो कायद्याच्या कलम ५(सी) किंवा भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२)(बी) अंतर्गत सार्वजनिक सेवक म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद आणि हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने दिला होता. या निर्णयामुळे देशभरातून समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या