"राज्याला मिळाले नवे पोलिस महासंचालक" "सदानंद दाते यांची पोलिस महासंचालक पदी नियुक्ती"

 

आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाने राज्याच्या पोलिस महासंचालक पदी केली आहे. सध्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या जागी ते पदभार स्वीकारणार आहेत. 



Sadanand Date Appointed DGP Of Maharashtra :- 

राज्याच्या पोलिस महासंचालक पदी आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या तीन जानेवारी पासून ते पदभार स्वीकारणार आहेत. सध्याचे राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ तीन जानेवारीला संपणार असल्याने त्यांची जागा घेणार आहेत.   राज्य शासनाच्या गृह विभागाने या निर्णयाचा शासन आदेश जारी केला असून, महासंचालक पदाचा त्यांचा कार्यकाळ दोन वर्षां साठीच असणार आहे.


Photo Source UNODC South Asia's X Account




कोण आहेत सदानंद दाते? 


१४ डिसेंबर १९६६ मध्ये त्यांचा जन्म झाला. १९९० च्या तुकडीचे भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकारी आहेत. दाते यांनी आयपीएस अधिकारी म्हणून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत, ज्यात सीबीआय मध्ये पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव सुद्धा आहे.  

     हम्फ्रे फेलोशिप कार्यक्रम अंतर्गत मिनेसोटा विद्यापीठात शिक्षण घेतले. तिथे त्यांनी अमेरिकेतील व्हाईट-कॉलर आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रित करण्याच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून अभ्यास केला.

   सदानंद दाते यांनी केंद्रात राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख म्हणून काम पाहिले. मुंबई मध्ये २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब ला पकडण्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावली होती. मुंबई हल्ल्या दरम्यान कामा रुग्णालयात महिला आणि मुलांचे प्राण वाचवल्याने  दाते यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले.


 ०१ एप्रिल २०२४ पासून राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महासंचालक होते. यापूर्वी त्यांनी सीबीआय मध्ये उप-महानिरीक्षक, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख, मुंबईतील सहपोलीस आयुक्त (गुन्हे, कायदा आणि सुव्यवस्था) मीरा-भाईंदर आणि वसई - विरार प्रदेशांचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या