"विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा" "काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळांची मागणी"



काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य निवडणूक आयुक्त यांना पत्र लिहीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.



Harshwardhan Sapkal Demands File a case against Rahul Narvekar :- 



राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांना सुरुवात झाली असून, आचारसंहिता सुरू आहे. अशातच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे पत्र लिहीत केली आहे.




Photo Source Shrinivas BV X Account.



 

"संबंधित पत्रात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावी आणि त्यांचे उभे असलेल्या नातेवाईक उमेदवारांच्या प्रचारात सहभागी असलेले विधानसभा अध्यक्ष यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी" हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

"मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी करिता विधान सभा अध्यक्षांच्या कुटुंबातील तीन सदस्य निवडणुकीत उभे असून, राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयातील जवळपास ७० अधिकारी आणि कर्मचारी महायुतीच्या प्रचारात सक्रिय सहभागी असून, अधिकारी आणि कर्मचारी यांना कार्यमुक्त करून त्यांच्यावर आचार संहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत" अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

"सध्या होत असलेल्या निवडणुकीत विरोधी पक्षांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकल्या जात असून, विरोधी पक्षांचे अर्ज दाखल न करण्यासाठी प्रशासन वर दबाव आणला जात आहे. विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले" असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रातून केला आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या