"आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव"


IRCTC घोटाळा प्रकरणी ट्रायल कोर्टाने दिलेल्या आदेशा विरोधात लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

 


Ex-CM Lalu Prasad Yadav Moves Delhi High Court :- 

  

बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाच्या (Trial Court) आदेशा विरोधात स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यां विरुद्ध फौजदारी आरोपांना आवाहन देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 




Photo Source ANI Digital X Account




राउज एव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांनी १३ ऑक्टोबर ला लालू यादव यांच्यावर भ्रष्टाचार, फौजदारी कट आणि फसवणूक असे आरोप लालु प्रसाद यादव यांच्यावर ठेवण्यात आले होते. तेजस्वी यादव आणि राबडी देवी यांच्यावर फौजदारी कट आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले.


    संबंधित प्रकरण पाच तारखेला या याचिकेवर न्यायाधीश स्वराना कांता शर्मा यांच्या समोर सुनावणी साठी उच्च न्यायालयात सूचीबद्ध करण्यात आली आहे.



बार अँड बेंच रिपोर्ट नुसार, २००४ ते २००९ दरम्यान लालू प्रसाद रेल्वे मंत्री होते. त्यावेळेस रांची आणि पुरी येथील आयआरसीटीसी च्या दोन हॉटेल्स एका बनावट निविदा प्रक्रिये द्वारे सुजाता हॉटेल्स नावाच्या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आली. त्याचा मोबदला म्हणून लालूंची पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांच्याशी संबंधित कंपनीला कोट्यवधी रुपयांची जमीन तिच्या बाजारभावाच्या कमी किंमत मध्ये हस्तांतरित करावी लागली. 


"संपूर्ण कट लपलेला नसून, पूर्ण झालेला व्यवहार वरवर पाहता फसवणुकीचा आहे आणि या टप्प्यावर आरोपींना दोषमुक्त केले जाऊ शकत नाही", असे न्यायालय म्हणाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या