एका बहिणीने भावाला त्याच्या स्वप्नातील बाईक भेट म्हणून दिली. त्यामुळे त्याने जाम आनंदित होत. बहिणीच्या पायावर डोकं ठेवत नमस्कार करून लोटांगण घातले आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमां वर चांगलाच व्हायरल झाला आहे.
बहीण भावाचे नाते हे पवित्र नाते आहे. हे नातं आई वडीलां नंतर जगातील सर्वात श्रेष्ठ बहीण भावाचे नाते मानले जाते. या नात्यात कधी गोडवा असतो. तर, कधी कटुता. कधी प्रेमळ असतो तर कधी खोडकर. असाच बहीण भावाचा एक व्हिडिओ समाज माध्यमां वर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भाऊ चक्क आनंदित होऊन बहिणीच्या पायावर डोकं ठेऊन लोटांगण घालतो.
व्हिडिओ मधील महिला तिच्या भावाला त्याच्या स्वप्नातील बाईक भेट देते. त्याची बहीण शोरुम मध्ये उभी असताना तिचा भाऊ येतो आणि तिच्या पायावर लोटांगण घालून चरण स्पर्श करतो. तेव्हा त्याची बहीण त्याला हसत आशीर्वाद देते. त्यानंतर तिचा भाऊ तिला प्रेमाने हसत आनंदात आलिंगन देतो.
व्हायरल व्हिडिओ वर तिने "छोटा भाई, तो पहला बच्चा होता हैं" आणि "I have surprised my brother with his dream bike and his reaction was totally worth it" असे लिहिले आहे.
व्हायरल व्हिडिओ @priti_bhosale15 या इंस्टाग्राम आयडी वरून पोस्ट करण्यात आला असून, आतापर्यंत ३०,०७७ लोकांनी या व्हिडिओ ला पसंती दर्शवली आहे व १०.०९ हजार लोकांनी व्हिडिओ शेअर केला आहे. तर 145 लोकांनी विडिओला रिपोस्ट केला आहे.
व्हिडिओ वर प्रतिक्रिया देताना एकीने म्हटलंय की, "भाऊ बहिण असावे तर असे" तर एक जण लिहितो, "बहन को भेजता हू क्या मालूम कर दे", तर एकाने म्हटलं "मेरी बहन को दिखाया तो वो बोली AI हैं" अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

0 टिप्पण्या