गायक मिका सिंह यांनी भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यांवरून सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे. कुत्र्यांच्या निवारा आणि कल्याणासाठी जमीन दान देणार असल्याचे जाहीर करत, सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे.
Singer Mika Singh Appeals Supreme Court :-
सुप्रसिद्ध गायक मिका सिंह यांनी भटक्या कुत्र्यांच्या सुरक्षितता आणि कल्याणासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे. देशभरात मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणावर सुप्रीम कोर्टाला केलेली विनंती चर्चेचा विषय ठरला आहे. ज्यामध्ये त्यांनी भटक्या कुत्र्यांची घेतली जाणारी काळजी, निवारा आणि कल्याणासाठी जमीन दान देण्यास तयार असल्याचे मिका सिंह यांनी अधिकृत एक्स अकाउंट वरून सांगितले.
काय म्हणाले मिका सिंह ?
कुत्र्यांच्या कल्याणावर प्रतिकूल परिणाम करणारी कुठलीही कृती होऊ देऊ नका. माझ्याकडे पुरेशी जमीन उपलब्ध असून, मी कुत्र्यांची काळजी, निवारा आणि कल्याणासाठी १० एकर जमीन दान करण्यास पूर्णपणे तयार आहे. परंतु, या प्राण्यांची जबाबदारीने काळजी घेऊ शकतील अशा योग्य मनुष्यबळ आणि काळजी वाहकांचा मला समर्थन लागेल.
"मी निवारा बांधण्यासाठी आणि कुत्र्यांची सुरक्षा, आरोग्य व कल्याण सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने असलेल्या सर्व उपक्रमांसाठी जमीन देण्यास तयार आहे", असेही मिका सिंह यांनी सांगितले.
Mika Singh humbly appeals to the Hon’ble Supreme Court of India to kindly consider refraining from any actions that may adversely affect the welfare of dogs.
— King Mika Singh (@MikaSingh) January 11, 2026
I respectfully submit that I have sufficient land at my disposal and am fully prepared to donate 10 acres of land… pic.twitter.com/oNlqxY5rTZ

0 टिप्पण्या