खासदार वर्षा गायकवाड यांनी माध्यमांवर नाराजीच्या सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याची विनंती केली. कालपासून माध्यमां मध्ये जागावाटप वरून खासदार प्रा. वर्षा गायकवाड नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
MP Varsha Gaiakwad Clarification On INC - VBA Alliance :-
राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीने वेग धरला असून, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक करिता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने कालच युती जाहीर केली. त्यामध्ये जागावाटपावरून मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा माध्यमां मध्ये सुरू होती. त्यावरून खासदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. माझी आणि प्रकाश आंबेडकर यांची नाळ एकच असल्याचे त्यांनी सांगितले.
![]() |
| Photo Source Prof. Varsha Gaiakwad Instagram Account |
खासदार वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण काय?
"सध्या निवडणुकीचा काळ आहे. त्यामुळे काल (रविवारला) पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्वच मुंबईचे पदाधिकारी बैठकीला वेळेवर हजर होते. बैठक आणि काँग्रेस-वंचित युतीची घोषणा एकाच वेळी आल्याने पत्रकार परिषद दरम्यान मी उपस्थित राहू शकली नाही. त्यामुळे जागावाटपा वरून नाराज असल्याचे वृत्त निराधार असल्याचे म्हणत, ही बाब तत्काळ थांबवण्याची विनंती केली.
आमची नाळ एकच
"मी बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी असून, प्रकाश आंबेडकर आणि माझी नाळ एकच आहे. देशाच्या संविधानाच्या रक्षणार्थ एकत्र एकत्रित निवडणूक लढवण्याची विनंती प्रकाश आंबेडकर यांना केली होती. या विनंतीला मान देऊन वंचित बहुजन आघाडी राजकीय संघटनेच्या नावाने सोबत आले आहेत. त्यामुळे मी त्यांचे आभार मानते", असे प्रतिपादन वर्षा गायकवाड यांनी केले.
संविधान आमचा धागा
आम्ही लोकशाहीला मानणारे असून, संविधान आमचा धागा आहे. प्रकाश आंबेडकर यांना एकत्रित निवडणूक लढविण्यासाठी आवाहन केलं होतं. त्याला त्यांनी उत्तमरीत्या प्रतिसाद देऊन, युती केली. मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबई मध्ये युती झाल्याने आता वेगळे समीकरण तयार झाले आहे.
जातीय तणाव वाढतोय
एकीकडे धर्माचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय. जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, असा टोला भाजपला लगावला. तर, दुसरीकडे भाषेचा वाद पेटवला जातोय, असा टोला मनसे वर लगावला. मुंबईच्या प्रश्नावर बोललं जात नाही.
"मुंबई महानगर पालिकेत आमच्या सोबत आघाडीत असलेल्या पक्षांना सोबत घेऊन आम्ही पत्रकार परिषद आयोजित करणार आहोत. त्यामध्ये आम्ही जाहीरनामा मांडणार आहोत. दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेवराव जानकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राजेंद्र गवई यांचाही समावेश आहे" असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
माझी आणि बाळासाहेब आंबेडकर यांची नाळ एक आहे. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनुयायी आहे. देशात लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी आम्हाला एकत्र आले पाहिजे ,ही माझी विनंती होती. त्या विनंतीला मान देऊन बाळासाहेबांनी आघाडी केली. मी त्यांची आभारी आहे.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 29, 2025
मुंबई महापालिका… pic.twitter.com/CzGW3J1VCc

0 टिप्पण्या