"मोदी सरकार सामान्य लोकांना लुटण्याची एकही संधी सोडत नाही", काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची रेल्वे तिकीट दरवाढी वरून टीका!

 



रेल्वे तिकीट दर वाढी वरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरर्ग यांनी केंद्र सरकार वर टीका केली आहे. वर्षभरातील ही दुसरी तिकीट दरवाढ अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीची आहे, असे खरगे म्हणाले.




Mallikarjun Kharge On Rail Fare Hike :- 



नुकतेच रल्वे मंत्रालयाने रेल्वे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला. 26 तारखे पासून रेल्वे तिकीट मध्ये दरवाढ करणार आहे. त्यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यात त्यांनी मोदी सरकार सामान्य लोकांना लुटण्याची एकही संधी सोडत नसल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. खरगे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंट वरून टीका केली.

    


Photo Source The Dalit Voice Official X Account



    "वर्षभरातील ही दुसरी तिकीट दरवाढ अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीची असून, स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प रद्द झाल्यापासून केंद्र सरकारने जबाबदारीच नाकारली. सरकार खोट्या जाहिरातबाजी मध्ये मग्न असल्याने रेल्वे व्यवस्था आजारी पडली," असल्याची टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.  


   

नेमके काय केले आरोप?  


रेल्वे अपघातात २.१८ लाख मृत्यू २०१४ - २०२३ दरम्यान झाले असल्याचा एनसीआरबी अहवाल (NCRB) चा उल्लेख खरगे यांनी केला. तर, रेल्वे आता सुरक्षित नसून, जीवावर बेतणारा जुगार झाला आहे. केंद्र सरकारने पाच वर्ष गाजावाजा केला. परंतु, रेल्वे व्यवस्थेत गांभीर्य दर्शवलेलं नाही. 


"रेल्वे विभागात ३.१६ लाख पदे रिक्त असून, बेरोजगार युवक - युवती कायमस्वरूपी नियुक्तीची वाट पाहत आहेत. परंतु, सरकार कंत्राटी नोकऱ्या जाहीर करण्यात व्यस्त आहे," अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. 

        


       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या