रेल्वे विभागाने तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सामान्य माणसांच्या खिशाला अजून कात्री बसण्याची चिन्हे आहेत. 26 डिसेंबर पासून नवे दर लागू केले जाणार आहेत.
तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर, बातमी तुमच्या साठी महत्त्वाची आहे. रेल्वेने प्रवास करायचा असल्यास आता वाढीव दर द्यावा लागणार आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. २६ डिसेंबर पासून रेल्वेचे तिकीट दर रेल्वेने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेच्या या निर्णयाचा प्रवाश्यांना चांगलाच फटका बसणार आहे. रेल्वेने 26 डिसेंबर पासून दर पद्धती मध्ये बदल करण्याची घोषणा केली असून, 215 किमी पर्यंत प्रवास करणाऱ्या जनरल प्रवाश्यांना सूट देण्यात आली आहे. जनरल वर्गातील प्रवासी २१५ किमी पेक्षा जास्त प्रवास करणार असेल तर, ०१ पैसा प्रती किमी शुल्क मोजावे लागणार.
उपनगरीय आणि मासिक पासच्या दरात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. मेल आणि एक्स्प्रेस ऐसी (AC) नसलेल्या ठिकाणी व AC वर्गा ला २ पैसे प्रती किमी दर आकारले जाणार आहेत. नॉन - ऐसी वर्गामध्ये ५०० किमी पर्यंत प्रवास करायचा असल्यास १० रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागतील.
नवीन दरामुळे होणार ६०० कोटी रुपयांचा फायदा
"नवीन दरा मुळे रेल्वेला यावर्षी ६०० कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचा दावा रेल्वे विभागाने केला आहे. मागील दशकात रेल्वेने त्याचे जाळे आणि कामकाज देशभरात पोहचवले आहे. त्यामुळे उच्च पातळी वरील कामकाज आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी मानवी संसाधनांची गरज आहे", असे रेल्वे विभागाचे म्हणणे आहे.
" रेल्वे वर १,१५,००० कोटी रुपयां पर्यंत मनुष्यबळाचा खर्च वाढला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांचा पेन्शन खर्च रुपये ६०,००० कोटिं पर्यंत वाढला असून, एकूण संचालन खर्च २०२४-२५ मध्ये २,६३,००० कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे," असे पत्रात नमूद आहे.
The Railway has announced a new fare structure effective from December 26, 2025, with no fare increase for journeys under 215 km in Ordinary Class. For journeys beyond 215 km, there will be a fare hike of 1 paise per km in Ordinary Class, and 2 paise per km for Mail/Express… pic.twitter.com/lD4fUQ8eeK
— ANI (@ANI) December 21, 2025

0 टिप्पण्या