गुजरात हाई कोर्ट एडवोकेट्स असोसिएशन संघटनेच्या अध्यक्ष पदी वकील यतिन ओझा यांची निवड करण्यात आली आहे.
Yatin Oza Elected President Of Gujrat High Court Advocates Association :-
गुजरात हाई कोर्ट ऍडव्होकेट असोसिएशन संघटनेच्या 18 वे अध्यक्ष पदी यतीन ओझा यांची निवड करण्यात आली आहे. बाबूभाई मंगुकिया यांचा 247 मतांच्या फरकाने पराभव करत यतीन ओझा यांनी विजय मिळवला. संघटनेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक 19 डिसेंबर ला पर पडली.
![]() |
| Photo Source B&B Associates LLP Instagram Account. |
संघटनेच्या निवडणुकीत यतीन ओझा यांच्यासह मंगुकिया, सध्याचे अध्यक्ष ब्रिजेश त्रिवेदी, दर्शन शाह आणि चित्रजित उपाध्याय यांनी सुद्धा अध्यक्षपदाची निवडणूक लढवली.
कोण आहेत यतीन ओझा ?
यतीन ओझा भारतीय राजकारणी आणि ज्येष्ठ वकील असून, हाई कोर्ट बार असोसिएशन च्या अध्यक्षपदी मागील 14 वर्षापासून पदावर कार्यरत आहेत.
ओझांचे ज्येष्ठ पद २०२० साली गुजरात उच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री वर भ्रष्टाचाराचे आरोप केल्या प्रकरणी काढून घेतले होते. न्यायालयाने ओझां विरुद्ध फौजदारी अवमान कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये दोषी आढळल्याने न्यायालयाचे कामकाज संपे पर्यंत साध्या तुरुंगवासाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड त्यांना ठोठावण्यात आला होता.
ओझा यांनी गुजरातमधील साबरमती मतदार संघातून विधानसभा सदस्य म्हणून 1995 ते 2001भारतीय जनता पार्टी कडून दोनदा विजय मिळवला. नंतर त्यांनी भारतीय जनता पार्टी मधून त्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश करून सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मनिनगर मतदार संघातून निवडणूक लढवली. परंतु, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
Senior Advocate Yatin Oza Elected As President Of #GujaratHighCourt Advocates' Association For 18th Time | @ISparshUpadhyay https://t.co/SSpMC4ZcAu
— Live Law (@LiveLawIndia) December 20, 2025
GHCAA%20president%20Y.jpg)
0 टिप्पण्या