डॉ. नुसरत परवीन यांच्यावर घडलेल्या घटने नंतर झारखंड सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये संबंधित महिला डॉक्टरला सन्मानजनक वातावरण देण्याची घोषणा झारखंड शासनाने केली आहे.
Jharkhand Govt. Offers Job To Doctor Nusrat Parveen :-
बिहार मधील महिला चिकित्सक डॉ. नुसरत प्रवीण यांच्यासोबत अमानवीय वर्तणूक घडल्यानंतर झारखंड सरकारने महत्त्वाचा पाऊल उचललं आहे. झारखंड राज्याचे स्वास्थ्य मंत्री डॉ. इरफान अंसारी यांनी 3 लाख रुपयाची नोकरी सह फ्लॅट देण्याचा ऐतिहासिक निर्णय झारखंड सरकारने घेतला आहे.
" बिहार मध्ये डॉ. नुसरत परवीन यांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकी नंतर झारखंड राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. इरफान अंसारी यांनी झारखंड आरोग्य विभागात रुजू होण्यासाठी 3 लाख रुपये महिना वेतन सह सरकारी आवास, मनासारखी पोस्टिंग आणि संपूर्ण सुरक्षा सह सन्मानजनक वातावरण", असा निर्णय आरोग्य मंत्री डॉ. इरफान अंसारी यांनी घेतला आहे.
बिहार राज्य सरकारने डॉ. नुसरत परवीन यांना दिली गेलेली वागणूक अमानवीय असून, घडलेल्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. कुठल्याही महिलेचा हिजाब ओढणे हा फक्त महिलेचा अनादर नसून, देशाचे संविधान आणि माणुसकीला काळीमा फासणारी बाब आहे.
"सरकारने केलेली ही नियुक्ती नसून, आदराचा विजय आहे. ज्याठिकाणी अपमान झाला त्याठिकाणी झारखंड शासनाने मानवतेचा संदेश दिलाय", अश्या प्रकारची पोस्ट एक्स वर पोस्ट करत आरोग्य मंत्री डॉ. इरफान अंसारी यांनी घोषणा केली आहे.झारखंड में महागठबंधन की सरकार का बड़ा और ऐतिहासिक फैसला
— Dr. Irfan Ansari (@IrfanAnsariMLA) December 19, 2025
बिहार में महिला डॉक्टर डॉ. नुसरत प्रवीण के साथ हुई अमानवीय और शर्मनाक घटना ने पूरे देश को झकझोर दिया।
हिजाब खींचना सिर्फ एक महिला का नहीं, संविधान और इंसानियत का अपमान है।
झारखंड के लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय हेमंत सोरेन… pic.twitter.com/f2mPl3F0Im
नितीश कुमार यांनी ओढला हिजाब
पटणा येथील शासकीय कार्यक्रमाच्या दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नियुक्ती पत्र देत असताना महिलेचा हीजाब ओढला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्यामुळे समाज माध्यमां वर ही घटना चांगलीच व्हायरल झाली. त्यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

0 टिप्पण्या