माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणारे आरोपी राकेश किशोर यांच्यावर अज्ञातांनी हल्ला करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Adv. Rakesh Kishor Beaten Up :-
देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी वकिल राकेश किशोर याच्यावर दिल्ली न्यायालय परिसरात चपलेने हल्ला करण्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
प्रकरण काय ?
माजी सरन्यायाधीश गवई यांनी खजुराहो मंदिरातील भगवान विष्णू वरील टिप्पणी प्रकरणी सर्वोच्च न्यायलयाच्या सुनावणी दरम्यान वकील आरोपी राकेश किशोर यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे सर्वोच्च न्यायालय मध्ये त्यावेळेस गोंधळ उडाला होता. त्यामुळे आरोपी राकेश किशोर ला तेथील सुरक्षा रक्षकांनी न्यायालयाच्या बाहेर घेऊन गेले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. नंतर त्यांच्यावर कुहलीही कारवाई करू नका असे स्पष्ट निर्देश गवई यांनी दिले.
सरन्यायाधीश गवई यांच्या निर्देशा वरून त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे वकिलांनी त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी देशाचे महान्यायवादी यांना पत्र लिहिले होते. त्यांच्या या मागणीचा विचार करत महान्यायवादींनी कारवाई करण्याची परवानगी दिली होती.
कालांतराने या प्रकरणाला तिथेच थांबा मिळाला असं अनेकांना वाटले होते. परंतु, आज दिल्ली येथील न्यायालयात अज्ञाताने आरोपी राकेश किशोर यांच्यावर हल्ला केला. हल्ला होत असताना राकेश किशोर "सनातन धर्म की जय हो" अश्या घोषणा देताना व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत आहेत.
संबंधित व्हायरल व्हिडिओ @PMishra_Journo यांच्या एक्स अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे.
हिंसा का जवाब हिंसा नहीं हो सकता है!
— Prabhakar Kumar Mishra (@PMishra_Journo) December 9, 2025
इनको पहचानिए! ये वही राकेश किशोर हैं जिन्होंने
पूर्व CJI जस्टिस गवई पर जूता फेंका था। ये तस्वीर
दिल्ली के कड़कड़डूमा कोर्ट परिसर की है। pic.twitter.com/XDFECWZK1p

0 टिप्पण्या