ज्येष्ठ समाजसेवक, सामाजिक न्यायासाठी आग्रही आणि श्रमिक चळवळीचे प्रमुख बाबा आढाव यांचे निधन झाले आहे. त्यांनी गोरगरीब कष्टकरी यांच्या करिता मोठा लढा दिला होता.
Social Activist Baba Adhav Death :-
ज्येष्ठ समाजसेवक, सामाजिक न्यायासाठी आग्रही आणि श्रमिक चळवळीचे प्रमुख बाबा आढाव यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसां पासून त्यांच्यावर पुण्यातील पूना हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बाबा आढाव यांचे सामाजिक कार्य
बाबा आढाव यांनी शिक्षण बीएससी मध्ये त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आयुर्वेद मध्ये पदवी घेऊन त्यांनी वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. १९५३ साली घरातच दवाखाना सुरू करून गरीब रुग्णांना सेवा देण्यास सुरुवात केली. सेवा देत असतानाच त्यांनी समाजातील शोषणाची जाणीव झाली. त्यानंतर सामाजिक संघर्ष करण्यास त्यांनी सुरुवात केली.
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ मानले जायचे. सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन असंघटित आणि वंचित कष्टकरी यांच्यासाठी समर्पित केले. विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी समर्पित केले . त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे 'हमाल पंचायती'ची स्थापना, ज्याच्या माध्यमातून त्यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले.
डॉ. बाबा आढाव पुणे महानगर पालिकेचे १९७० च्या दशकात नगरसेवक होते. "एक गाव एक पाणवठा" नावाची मोहीम त्यांच्याच नेतृत्वात चालवली जात होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी दोन दिवसां पूर्वी रुग्णालयात जाऊन भेट घेतल्याची माहिती एक्स त्यांच्या एक्स अकाउंट वरून दिली होती.

0 टिप्पण्या