संघर्षा शिवाय पर्याय नाही. असाच व्हिडिओ झेप्टो एजंट ५२ वर्षीय बाईचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अनेकांना प्रेरणादायक ठरत आहे.
Zepto Agent Women Viral Video :-
संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यापासून कोणीही वाचलेला नाही. कित्येकजण येणाऱ्या परिस्थितीला तोंड देतात आणि यशस्वी होतात. परंतु, कित्येकजण येणाऱ्या परिस्थितीला तोंड न देता पळ काढतात. त्यामुळे परिस्थितीला तोंड देणारे लोकंच आयुष्यात कधीच हार न मानता संघर्ष करत असतात. असेच लोक इतरांना प्रेरणा देत असतात. अशीच एक 52 वर्षीय महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
वायरल व्हिडिओ मधील महिलेचे नाव विना देवी असे असून, त्यांना ५०% पक्षाघात (Paralysis) मारले असले. तरी, ती स्वतः झेपटो एजंट म्हणून काम करत असल्याचे ती मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा हिला सांगते. हा व्हिडिओ अभिनेत्री आणि मॉडेल मलाईका अरोरा हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला असून, काही क्षणांतच तुफान व्हायरल झाला आहे.
५० टक्के लकवा तरी जिद्द सोडली नाही
व्हायरल व्हिडिओ मध्ये मलायका अरोराला ५२ वर्षीय बाई रस्त्यावर भेटते. तेव्हा तिला तिथे काठी दिसते. त्यामुळे मलायका अरोरा विचारते की तुम्हाला काही समस्या आहे का? त्यावर झेप्टो एजंट शांतपणे आणि हसतमुखाने उत्तर देते की मला ५०% अपंगत्व आहे. परत, प्रश्न विचारला जातो तेव्हा ती वय ५२ वर्ष असून, मागील जून महिन्यापासून काम करत असल्याचे सांगते.
तुम्हाला मदत करायची असल्यास कशी करावी असा प्रश्न मलायका अरोरा विचारते त्यावर ती हसत उत्तर देत म्हणते, "अशीच मदत करत रहा".
वायरल व्हिडिओमध्ये जणू महिलेला असा संदेश द्यायचा असेल की मला कुठलीही अपेक्षा नाही आणि माझी कुठलीही मागणी नाही. फक्त आदर आणि कृतज्ञता हा भाव या व्हिडिओमध्ये महिलेने संपूर्ण जीवनाचा सार शिकवून टाकले.
काय दिल्या लोकांनी प्रतिक्रिया?
व्हायरल व्हिडिओ मध्ये अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एक जण लिहिते, " विना जी तुम्ही इतरांसाठी प्रेरणा देणारे आहात". एक जण लिहितो " सलाम आहे तुम्हाला,सलाम आहे तंत्रज्ञानाला". एकाने लिहिले, " खरंच प्रेरणादायक, तिचे हास्याने माझं ह्रदय वितळल." एकाने लिहिलं,"गॉड ब्लेस हर."
"रडणे थांबवा आणि संघर्ष करत रहा. जीवन खूप मौल्यवान आहे." असा संदेश व्हिडिओच्या शेवटी मलायका अरोरा देते.

0 टिप्पण्या