डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असताना वाटेत पोलिसांनी अडवले. त्यामुळे तिथे बराच वेळ तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान अँब्युलन्स तिथे पोहचल्याने वाट मोकळी करून दिली. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी देशभरातून अनेक आंबेडकरी अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर येत असतात. यंदाही अनेक आंबेडकरी अनुयायांनी यादरम्यान मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यादरम्यान चैत्यभूमीवर येत असताना वाटेत अअँब्युलन्स ला वाट मोकळी करून दिली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
चैत्यभूमी कडे प्रस्थान करत असताना तुर्भे इथून रिक्षाने काही आंबेडकरी जनसमुदाय चैत्यभूमी कडे निघाले. परंतु, चुना भट्टी सायन कनेक्टर जवळ पोहचताच त्यांना पोलिसांनी अडवले आणि पुढे जाण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे संतप्त जमावाने जागीच रस्ता रोको आंदोलन सुरू केले.
यामुळे दादर कडे जाणाऱ्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झाली. गाड्यांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत होत्या. त्यामुळे पोलिसांनी आंबेडकरी अनुयायांना पोलिसांनी बराच वेळ समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, यादरम्यान दोघां मध्ये शाब्दिक चकमक झाली.
याचवेळी अँब्युलन्स चा प्रवेश झाल्याने आंदोलन थांबवले. तेथील अनुयायांनी अँब्युलन्स ला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून, सर्व अनुयायांचे कौतुक होत आहे.
व्हायरल व्हिडिओ @SandipKapde यांच्या x अकाऊंट वरून शेअर करण्यात आला आहे. "ही भीमाची लेकरं… चैत्यभूमीवर जाण्यासाठी रस्ता रोखला, पण रुग्णवाहिका दिसताच आंदोलन थांबवलं, मानवता जिंकली! Video पाहा" असं कॅपशन संदीप कापडे यांनी दिलं आहे.
ही भीमाची लेकरं… चैत्यभूमीवर जाण्यासाठी रस्ता रोखला, पण रुग्णवाहिका दिसताच आंदोलन थांबवलं, मानवता जिंकली! Video पाहा #Mumbai #BabasahebAmbedkar #MahaparinirvanDiwas pic.twitter.com/3RdHQzCx8X
— sandip kapde (@SandipKapde) December 6, 2025

0 टिप्पण्या