अभिनेते सिद्धांत चतुर्वेदी ने आंतरजातीय प्रेम प्रकरणात हत्या करण्यात आलेला युवक सक्षम ताटे याला स्वतःला मिळालेला पुरस्कार समर्पित करण्यात आल्याची पोस्ट त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर करण्यात आली आहे.
Siddhant Chaturvedi Dedicates Award To Saksham Tate :-
सक्षम ताटे आणि आँचल मामिडवार हे दोघे एकमेकांवर प्रेम करत होते. त्यानंतर सक्षम ताटे या युवकाची हत्या करण्यात आली. दोघांचंही आंतरजातीय प्रेम प्रकरण होतं. याचा राग धरून मुलीच्या वडील आणि भावाने तिच्या प्रियकराची हत्या केली. संपूर्ण प्रकरण घडल्यानंतर देशभरात चांगलाच चर्चेचा विषय बनला. अशातच सिने अभिनेते सिद्धांत चतुर्वेदी यांनी या प्रकरणी पोस्ट केली असून, पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
![]() |
चित्रपटात उत्कृष्ट अभिनय पार पाडल्या बद्दल भूमिकेसाठी "पॉवर पॅक्ड परफॉर्मर ऑफ द इयर" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिद्धांत चतुर्वेदी यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार सक्षम ताटे यांना समर्पित केला आहे. याची घोषणा त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून केली आहे. ज्यामुळे चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. धडक भाग २ या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका बजावली होती.
काय आहे पोस्ट ?
पोस्ट मध्ये सिद्धांतने सर्वांचे आभार मानले असून, प्राप्त झालेला पुरस्कार फक्त माझाच नसल्याचे सांगितले आहे. हा पुरस्कार प्रत्येकाचे आहे ज्यांना बहिष्कृत केले गेले. कायमच बाजूला ढकलले गेले व त्यांच्यावर भेदभाव केला गेला. अश्या परिस्थिती मध्ये त्यांनी परत उभे राहण्याची, लढण्याची आणि अस्तित्वाचा हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी आंतरजातीय भेदभावाच्या आणखी एका प्रकरणात स्वतः चा जीव गमावणारा सक्षम ताटे ला हा पुरस्कार समर्पित करत असल्याचे त्याने सांगितले.

0 टिप्पण्या