"वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या लेकीचा वडीलां सोबतचा संवाद तुफान व्हायरल" " व्हिडिओ बघून तुमचेही डोळे भरून येतील"

 

वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने तिच्या वडिलांना रात्री 2 वाजता फोन करून वडिलांना तणावग्रस्त असल्याचे सांगते. त्यावर तिचे वडील तिची समजूत काढतात. व्हिडिओ समाज माध्यमां वर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


Viral Video Father Daughter Conversation:-


सध्याचा विद्यार्थी आणि तरुण मानसिक नैराश्यातून जात असल्याचे अनेकदा आपण सभोवताली बघत असतो. युवकांना शिक्षण पूर्ण झाल्या नंतर प्रश्न पडतो तो नौकरीचा. नौकरी लागण्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेतो. परंतु, काही जणांना यश येते. तर, काहींना अपयश. अपयश आलं की लगेच खचून जातात. मग अश्यावेळी मित्र किंवा मैत्रिणीला फोन लावत असतात. असाच एक व्हिडिओ वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थिनीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात बाप लेकीचा संवाद कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. 




       वैद्यकीय शिक्षण हे जगातील सर्वात कठीण शिक्षण असल्याचे बोलले जाते. व्हायरल व्हिडिओ मध्ये मुलगी वडिलांना रात्री 2 वाजता फोन करते आणि तिच्या मनातील सर्व ताण वडिलां समोर व्यक्त करते. ज्यावरून व्हिडिओ बघताना संबंधित विद्यार्थिनी नौकरी न लागण्या वरून किती तणावग्रस्त आहे हे आपल्या लक्षात येईल. 

          

             वडिलांचा मुलीला प्रेरणादायक सल्ला

व्हिडिओ मध्ये बाप लेकीला म्हणतोय की, " डॉक्टर झाल्यानेच सगळं काही होईल. असं काहीच नसतं. जगात भरपूर पद असून, चांगल्या चांगल्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे तू खचून जाऊ नकोस. मी अजून म्हातारा झालेलो नाही. त्यामुळे मी भरपूर पैसे कमवेल त्यामुळे तू काळजी करु नको. स्वतःला त्रास होईल इतका अभ्यास करू नकोस" असा सल्ला देताना दिसत आहे. वडिलांनी बोललेल्या शब्दांमुळे लेकीच्या डोळ्यातून पाणी येते. 

       हा व्हिडिओ लक्षय मेहता यांच्या एक्स अकाउंट वर शेअर करण्यात आला असून, व्हिडिओ वर "तरुण मुलगी करिअरच्या प्रचंड दबावाखाली तुटते, पण तिच्या वडिलांचे शांत आणि प्रेमळ शब्द तिला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतात" असे केप्शन इंग्रजी मध्ये देण्यात आले आहे. 



  काय आहे नेटकऱ्यांचे प्रतिक्रिया ? 


व्हायरल व्हिडिओ वर प्रतिक्रिया देताना एकाने म्हटलं की, " मुलगी कितीही बलवान असो, कितीही मोठी स्त्रीवादी असो, स्वतंत्र असो, शेवटी वडील त्यांच्यासाठी ताकदीचा आधारस्तंभ असतात, या मुलीला तिची आई नाही तर वडील म्हणतात." एकाने लिहिले " हा आवाज परमेश्वर पिता ने दिलेला एक आशीर्वाद आहे. यापासून वंचित झाले तर जीवनाचे मार्ग खूप कठीण होऊन जातात. ज्यांना हा आशीर्वाद मिळाला आहे तो या संसाराचा भाग्यवान व्यक्ती आहे." तर, एक लिहिते "व्हिडिओ फार सुंदर असून, हृदयस्पर्शी आहे. मुलीच्या वडिलांना सलाम." यासारखे प्रतिक्रिया एक्स वर रिपोस्ट करत नेतकरी देताना दिसत आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या