भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी हनी बाबू यांना बॉम्बे उच्च न्यायालया कडून जामीन मंजूर

 

बॉम्बे उच्च न्यायालयाने प्राध्यापक हनी बाबू यांना मोठा दिलासा दिलेला असून, त्यांच्या जामीन अर्जाला मंजुरी दिली आहे. 


Bombay High Court Grants bail to DU Professor Hani Babu :- 


भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभागी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनी बाबू यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश ए एस गडकरी आणि रणजितसिंह भोसले यांच्या विभागीय खंडपीठाने हा निर्णय दिला. 




Photo Source Nitin Meshram X Account



           भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडल्या नंतर हनी बाबू यांना 28 जुलै 2020 रोजी त्यांना एनआयए ने अटक केली होती. तेव्हा पासून त्यांची तुरुंगातून सुटका झालेली नव्हती. तब्बल 5 वर्षा पासून त्यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याच्या कथित कटात सहभाग प्रकरणी अटकेत आहेत. 

बाबूला जामिन मिळवण्याकरिता १ लाख रुपये भरण्याचे जामीनपत्र जमा केल्यानंतर सोडण्यात येईल, असा निर्देश न्यायलयाने दिला आहे.

        हनी बाबू यांनी  मे २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, नंतर विशेष परवानगी याचिका मागे घेतली आणि परिस्थिती बदलल्याचे कारण सांगत जामिन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यायची असल्याचे सांगितले.

         सुनावणी दरम्यान "रोना विल्सन आणि सुधीर धावडे यांच्याप्रमाणे बाबू यांनी तुरुंगात बराच काळ घालवलेला नाही आणि त्यामुळे दीर्घ तुरुंगवासाच्या आधारावर त्यांना जामीन देता येणार नाही" असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला.

   फेब्रुवारी २०२२ मध्ये, महाराष्ट्रातील एका ट्रायल कोर्टाने त्यांनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळला. सप्टेंबर २०२२ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने बाबूचा जामीन अर्ज फेटाळण्याचा ट्रायल कोर्टाचा निर्णय कायम ठेवला.

        यापूर्वी ज्योती जगताप, रमेश गायचोर आणि इतर जणांना या प्रकरणात जामीन मिळाली होती. 


          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या