"उद्धव ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट ची मागणी रद्द" वकील असीम सरोदे यांची माहिती

 

भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्याच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वकीलाने आयोगास पत्र लिहले. आता अटक वॉरंट ची मागणी रद्द झाली असल्याची माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली आहे. 



Adv. Asim Sarode On Arrest Warrent Of Uddhav Thakre :- 

 

निवडणुकीच्या व्यस्ततेमुळे शरद पवार यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राची माहिती घेण्यासाठी वेळ मिळाला नसून, आज आम्ही वकीलपत्र उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आयोगा समोर दाखल केला आहे. त्यामुळे अटक वॉरंट रद्द ठरतो, अशी माहिती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे वकिल असीम सरोदे यांनी दिली. 


Photo Source Adv. Asim Sarode 
                                  Facebook 




     पुढील सुनावणी सात ते दहा जानेवारी दरम्यान होणार असून, उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आठ तारखेला प्रतिज्ञापत्रावर आयोग समोर आम्ही मांडणार असल्याचे वकील असीम सरोदे यांनी सांगितले. 


वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे वकील किरण कदम यांनी आजच सकाळी भीमा कोरेगाव चौकशी आयोगाला पत्र लिहीत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची मागणी करणारे पत्र आयोगास सादर केले. 


 " शरद पवार यांनी लिहिलेले पत्र उद्धव ठाकरे यांनी आयोगापुढे सादर करावे. व त्याकरिता उद्धव ठाकरे यांना नोटीसही बजावली. परंतु, उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची मागणी," प्रकाश आंबेडकर यांच्या वकीलने केली. 

   भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने कागदपत्र सादर न केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावत तुमच्या विरोधात अटक वॉरंट जारी का करू नये असा सवालही उद्धव ठाकरे यांना केला होता. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या