वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील कागदपत्र सादर न केल्याने अटक वॉरंट जारी करण्याची मागणी करणारे पत्र भीमा कोरेगाव चौकशी आयोगाला लिहिले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना नोटीस बजावूनही सुनावणीस हजर न राहिल्याने किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या वतीने शरद पवार यांनी लिहिलेले पत्र सादर न केल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे वकील किरण कदम यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोग कडे पत्र लिहीत केली आहे.
![]() |
| Photo Source Amock X Handle. |
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातील भीमा कोरेगाव गाव येथे 2018 साली दंगल उसळली होती. या प्रकरणाच्या चौकशी साठी भीमा कोरेगाव चौकशी आयोग स्थापन करण्यात आला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार संदर्भात एक पत्र लिहिले होते. ते पत्र आयोगा ने शरद पवार यांना सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, त्या पत्राची प्रत माझ्याकडे नसल्याची माहिती शरद पवारांनी आयोगाला दिली होती. त्यामुळे त्या पत्राची प्रत उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे का अशी विचारणा आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या कडे केली.
उद्धव ठाकरे यांना शरद पवारांनी लिहिलेले पत्र स्वतः किंवा प्रतिनिधी मार्फत सादर करण्याचे निर्देश दिले. परंतु, उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिक्रिया आल्याच नाही. मंगळवारला सुद्धा कागदपत्र सादर करण्याची नोटीस बजावली. परंतु, प्रतिसाद न दिल्याने प्रकाश आंबेडकरांचे वकिल किरण कदम यांनी उद्धव ठाकरे यांना अटक वॉरंट जारी करण्याची मागणी करत पत्र लिहीले.
मागील सुनावणी दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट का काढू नये असा सवाल करत भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने नोटीस बजावली होती. त्यानुसार म्हणणे मांडण्यासाठी आयोगाने मंगळवार दिवस दिला होता.

0 टिप्पण्या