"अभिनेत्री हेमा मालिनी झाल्या भावुक" म्हणाल्या, "धमेंद्र माझ्यासाठी सर्वस्व"

 



अभिनेत्री व विद्यमान खासदार हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठवणींना उजाळा अधिकृत एक्स अकाउंट वर दिला आहे. यासह त्यांनी धर्मेंद्र सोबतचे फोटो शेअर केले आहे. 




Hema Malini On Dharmendra :- 

नुकतेच 24 तारखेला हिंदी सिने सृष्टीतील दिग्गज अभिनेते व शोले चित्रपटातील विरू म्हणजेच धर्मेंद्र यांचे निधन झाले. त्यामुळे सिने सृष्टीत शोककळा पसरली होती. बिग बी अमिताभ बच्चन पासून ते सर्वसामान्य चाहते यांच्या पर्यंत सर्वांचे डोळे त्याप्रसंगी पाणावले होते. अशातच त्यांची दुसरी पत्नी अभिनेत्री, खासदार आणि  ड्रीम गर्ल  हेमा मालिनी यांनी पती धर्मेंद्र यांच्या निधना नंतर पोस्ट करत भावनिक झाल्या असून, धर्मेंद्र माझ्यासाठी सर्वस्वी असल्याचे त्यांनी समाज माध्यामां वर पोस्ट करत सांगितले आहे. 

             



Photo Source Hema Malini X Official Account




         

काय आहे हेमा मालिनी यांची पोस्ट? 

 

अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांनी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. म्हणाले, " धर्मेंद्र माझ्यासाठी सर्वस्वी होते. तो माझ्या दोन्ही मुलींसाठी ईशा आणि अहाना प्रेमळ वडील व माझ्यासाठी प्रेमळ नवरा होता. तो माझ्यासाठी मित्र, तत्त्वज्ञानी, मार्गदर्शक, कवी आणि गरज असताना त्यांनी प्रत्येक वेळेस माझ्यासाठी उपस्थिती दर्शवली. धर्मेंद्र यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावाने माझ्या कुटुंबातील सर्वांना आपलेसे करून घेतले होते.  

   "धर्मेंद्र सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून, त्यांची प्रतिभा, लोकप्रियता असूनही त्यांची नम्रता आणि त्यांचे सार्वत्रिक आकर्षण यामुळे ते सर्व दिग्गजां मध्ये अतुलनीय एक अद्वितीय प्रतीक म्हणून वेगळे झाले. चित्रपट उद्योगातील त्यांची शाश्वत कीर्ती आणि कामगिरी कायम राहतील".

          "धर्मेंद्र यांची सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून, त्यांची प्रतिभा आणि लोकप्रियतेनंतरही त्यांची नम्रता आणि सार्वत्रिक आकर्षण यामुळे संपूर्ण दिग्गजां मध्ये ते अतुलनीय आणि अद्वितीय प्रतीक ठरतात".  

            "माझे वैयक्तिक नुकसान अवर्णनीय असून, निर्माण झालेली पोकळी आयुष्यभर राहील. अनेक वर्ष एकत्र राहिल्यामुळे, माझ्याकडे अनेक खास क्षण पुन्हा जगण्यासाठी बऱ्याच आठवणी आहेत". 

   

    




   यासह त्यांनी बरेच आठवणीतील फोटो अधिकृत एक्स अकाउंट वर शेअर केले आहे. जिथे आठवणींना उजाळा दिला आहे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या