कॉमेडियन कुणाल कामरा याची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. ज्यावर भाजपने आक्रमक होत टीका केली आहे. त्याची ही पोस्ट समाज माध्यमा वर चांगलाच चर्चेचा विषय ठरलेला आहे.
Kunal Kamra Viral Post:-
कॉमेडियन कुणाल कामरा त्यांच्या शैलीद्वारे टीका करत असतात. आता अजून परत एकदा चर्चेत आले आहेत. एका टी-शर्ट वर काढलेल्या चित्रा वरून चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. ज्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
![]() |
| Photo Source Kunal Kamra Official X Account |
नेमकी पोस्ट काय आहे?
स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा ने काळ्या रंगाचं टी- शर्ट घातलेलं पोस्ट केलं. ज्यामध्ये तो चष्मा लावून मोबाईल वापरताना व्हायरल फोटो मध्ये दिसतोय. त्या टी- शर्ट वर आरएसएस लिहिलेलं असून, आर अक्षरा समोर कुत्रा दिसतोय. या फोटोसह त्याने "Not Clicked at Comedy Club" असं कॅप्शन दिलेलं आहे. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
Not Clicked at a comedy club ❤️❤️❤️ pic.twitter.com/pV7P83jgEn
— Kunal Kamra (@kunalkamra88) November 24, 2025
काय म्हणाले भाजप नेते?
"संघाच्या कामात अडथळा निर्माण करणारी अशी अनेक कुत्रे गाढवे समोर आली. संघाबद्दल खोटा प्रचार आणि चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, समाजानेच त्यांना नाकारले. त्यामुळे संघाचा प्रचार प्रसार होत गेला आणि त्या कुत्र्यांचं अस्तित्व इतिहासजमा होत गेला, त्यापैकी हा एक श्वान असल्याची", टीका भाजपचे नवनाथ बन यांनी केली.
"याप्रकारच्या अनेक कुत्र्यांनी आणि गाढवांनी संघाच्या कामावर तीव्र आक्षेप घेतला. परंतु, समाजानेच त्यांना नाकारले. म्हणून संघ वाढत राहिला. कुत्री गाढव गायब झाली", अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.
"आक्षेपार्ह पोस्ट्स टाकणाऱ्या व्यक्ती विरोधात पोलिसां तर्फे कारवाई केली जाईल", असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया काय ?
कॉमेडियन कुणाल कामरा च्या या पोस्ट वर अनेकांनी समर्थनार्थ कॉमेंट केली. तर, कोणी विरोधात कॉमेंट केली. एकाने लिहिलं "तुझी टी शर्ट आवडली. तर एक म्हणते, "कुणाल कामरा रुकेगा नहीं", एकाने लिहिलं "कामरा सुनता सबकी, करता स्कॅमग्रेस की".

0 टिप्पण्या