हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नोलॉजी, बीसीए, बि. बी. ए., बी.एम.एस आणि बी बी एम अभ्यासक्रमांतील प्रवेश परीक्षेचे एकत्रीकरण करण्यात आले असून, सीईटी सेलने परिपत्रक व्दारे स्पष्ट केले आहे.
व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यां साठी महत्त्वाची बातमी आहे. हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नोलॉजी, बीसीए, बि.बी.ए., बी.एम.एस आणि बीबीएम अभ्यासक्रमांतील प्रवेश परीक्षा (2026) मध्ये बदल करण्यात आला आहे. सीईटी व्दारे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या बी एचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम प्रवेश परीक्षा आता एकत्रित घेण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या परीक्षेचे MAH -HMCT/BCA/BBA/BMS/BBM असे नामकरण केल्याची माहिती सीईटी सेलने दिली.
![]() |
| Photo Source State CET Cell Mumbai X Official Account. |
सदर परीक्षा 28 एप्रिल २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या दरम्यान होणार असून, आज पर्यंत दोन स्वतंत्र परीक्षा सीईटी सेल व्दारे घेतल्या जात होत्या. परंतु, MAH-B HMCT, BCA, BBA, BMS आणि BBM या परीक्षा पूर्वी स्वतंत्र घेतल्या जात होत्या. या पाचही अभ्यासक्रमातील प्रवेश पात्रता समान असल्याने प्रवेश परीक्षा एकत्रित घेणे योग्य असल्याचे सीईटी सेलचे म्हणणे असून, सर्व विद्यार्थ्यांना लाभदायक ठरेल, असे परिपत्रक सीईटी सेल ने काढले आहे.
या परीक्षेचा कालावधी १२० मिनिटे राहणार असून, सीईटी चा अभ्यासक्रम संकेतस्थळावर दिलेला आहे. संबंधित विद्यार्थी, पालक आणि सहभागी संस्थांनी नोंद घ्यावी, असे जाहीर आवाहन परिपत्रकानुसार करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या