देशाला मिळाले नवे सरन्यायाधीश " "न्यायाधीश सूर्यकांत यांनी घेतली ५३ व्या सरन्यायाधीश पदाची शपथ"


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी 53 व्या सरन्यायाधीश पदाची आज शपथ घेतली. याप्रसंगी अनेक केंद्रीय मंत्री आणि माजी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती उपस्थित होते. 


 

Justice Suryakant Takes Oath as a  CJI :- 


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी आज (24 नोव्हेंबर) 53 व्या सरन्यायाधीश पदाची शपथ राष्ट्रपती भवन येथे घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कार्यकाळ संपल्याने ते सेवानिवृत्त झाले. आता सरन्यायाधीश सूर्यकांत हे ९ फेब्रुवारी 2027 पर्यंत देशाचे सरन्यायाधीश पदावर असतील.


Photo Source Abdul Salam X Account 





कोण आहेत सरन्यायाधीश सूर्यकांत ?

 
न्यायाधीश सूर्यकांत यांचा जन्म १० फेब्रुवारी १९६२ मध्ये हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्या मधील पेटवाड गावात मध्यम वर्गीय परिवारात झाला. रोहतक मधील महर्षी दयानंद विद्यापीठातून 1984 साली कायद्याची पदवी मिळवली. त्यानंतर हिसार जिल्ह्यातील न्यायालय मध्ये त्याच वर्षी पासून वकिली करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय येथे त्यांनी प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली. सरन्यायाधीश कांत यांनी मानवाधिकार, लैंगिक न्याय, शिक्षण आणि जेल सुधारणा सह बऱ्याच मुद्द्यावर निर्णय दिला.


 




जम्मु आणि काश्मीर ला विशेष दर्जा प्राप्त कलम 370 रद्द करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कां मधील प्रकरणे व बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणा संदर्भातील निर्वाळा तत्कालीन न्यायाधीश सूर्यकांत यांनी दिला.




याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल, लोकसभा सभापती ओम बिर्ला, उप राष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय मंत्री हरदिप सिंह पुरी, एच. डी. कुमारस्वामी, पियूष गोयल, जे. पी. नड्डा आणि माजी उप राष्ट्रपती जगदीप धनखड शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या