केंद्र शासनाने अंमलात करण्यास सुरुवात केलेल्या चार कामगार संहिता मध्ये पाच प्रमुख मागण्या सत्यात उतरवण्याचा सल्ला काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी दिला.
Jairam Ramesh On 4 Labour Code :-
नुकतंच केंद्र सरकारने चार श्रम संहिता देशभरात लागू केले आहेत. ज्याचा फायदा कामगार वर्गांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. या चार श्रम संहितेवर काँग्रेसचे नेते व राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी केंद्र शासनाला अधिकृत एक्स अकाउंट वरून सल्ला दिला.
![]() |
| Photo Credit The Shillong Times X Official Account. |
काय दिलाय सल्ला ?
- राष्ट्रीय किमान मजुरी ४०० रुपये प्रति दिवस मनरेगा योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करा.
- आरोग्याचा अधिकार कायदा ज्यामुळे पंचवीस लाख रुपयांचा युनिव्हर्सल आरोग्य कव्हरेज मिळेल.
- शहरी क्षेत्रांसाठी रोजगार हमी कायदा.
- सर्व असंघटित कामगारांसाठी व्यापक सामाजिक सुरक्षा ज्यामध्ये जीवन विमा आणि अपघात विमा समाविष्ट असेल.
- सरकारी विभागांतील कोर कार्यां मधील कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला बंद करण्यासाठी कटीबद्धता.
केंद्र शासनाने २९ कायद्यांना एकत्रित करून चार संहिता निर्माण केल्या आहेत. सरकार हे संहिता क्रांतिकारी असल्याचे सांगते. परंतु, श्रम संहितेचे नियम अजूनही नोटिफाईड केलेले नाही, असा आरोप जयराम रमेश यांनी केला.
जयराम रमेश यांच्या या पोस्टला काँग्रेसच्या अधिकृत एक्स अकाऊंट ने रिपोस्ट केलं आहे.
<
मौजूदा 29 श्रम-संबंधी क़ानूनों को फिर से पैक करके 4 कोड में बदल दिया गया है। इसे एक क्रांतिकारी सुधार की तरह प्रस्तुत किया जा रहा है, जबकि इनके नियम अभी तक नोटिफाइड भी नहीं हुए हैं।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) November 22, 2025
क्या ये कोड भारत के मज़दूरों की श्रमिक न्याय की इन 5 बुनियादी मांगों को हकीकत बना पाएंगे?
1.…

0 टिप्पण्या