"देशभरात चार नवे कामगार संहिता लागू" , "केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांची घोषणा"


केंद्र सरकारने कामगारांच्या हितासाठी चार नवे कामगार संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ देशभरातील कामगारांना होणार आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. 


Four New Labour Code :- 

देशभरातील कामगारांसाठी आनंदाची बाब आहे. केंद्र सरकारने चार नवीन श्रम संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कायदे कामगारांना खऱ्या अर्थाने आवाज उठविण्यास सक्षम करते आणि कामाच्या ठिकाणी शिस्त आणि सहकार्य मजबूत करते असं सरकारचं म्हणणं आहे. चार श्रम संहिता (Code) लागू झाल्याची माहिती स्वतः कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविय यांनी एक्स अकाउंट वर दिली. 

   

        केंद्र शासनाने जुन्या २९ श्रम कायद्यांना रद्द करून त्याऐवजी चार संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे संहिता 21 नोव्हेंबर 2025 पासून संपूर्ण देशभरात लागू करण्यात आले आहे. 

 









   लागू झालेले चार श्रम संहिता खालीलप्रमाणे :- 

  •  वेतन संहिता २०१९
  • औद्योगिक संबंध संहिता २०२०
  •  सामाजिक सुरक्षा संहिता २०२०
  • व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संहिता (OSHWC) २०२० 



       काय आहेत नवीन श्रम संहितेतील प्रमुख मुद्दे ? 


  1. सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी. 
  2. तरुणांना नियुक्ती पत्राची हमी.
  3. महिलांना समान वेतन आणि आदराची हमी. 
  4. चाळीस कोटी श्रमिकांना सामाजिक सुरक्षेची हमी.
  5. नोकरीच्या एका वर्षानंतर ग्रॅच्युइटी ची हमी. 
  6. ४० वर्षा पेक्षा अधिक आयु असलेल्या श्रमिकांना मोफत आरोग्य तपासणीची हमी. 
  7. ओव्हरटाईम केल्यास दुप्पट वेतनाची हमी . 
  8. धोकादायक क्षेत्रातील कामगारांना १०० टक्के आरोग्य सुरक्षिततेची हमी. 
  9. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार श्रमिकांना सामाजिक न्यायाची हमी. 


काय म्हणाले केंद्रीय मंत्री मनसुख मांडविय?


"या सुधारणा केवळ एक बदल नाही. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तर्फे कामगारांच्या कल्याणा करिता घेतलेला एक ऐतीहासिक निर्णय आहे. लागू केलेले श्रम संहिता आत्मनिर्भर भारताच्या दिशेने उचलेले महत्त्वाचे पाऊल आहे." असे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविय म्हणाले.


       पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? 


आज माझ्या श्रमिक बांधवांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. आमच्या सरकारने चार कामगार संहिता लागू केले आहे. देश स्वतंत्र झाल्या नंतर कामगारांच्या हिता करिता सर्वात मोठा सुधारणा असून, देशातील कामगारांना हा निर्णय मजबूत करणारा आहे. यामुळे नियमाचं पालन करणे सोपं होणार असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या