नागपूर:-
ताजबाग येथे सुफी संत बाबा ताजुद्दीन यांचा 103 वा ऊर्स मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवार ला रात्री उशिरा दर्ग्याला भेट दिली. त्याप्रसंगी , "आपल्या सर्वांच्या जीवनात त्यांचा आशीर्वाद असून, संपूर्ण देशातूनच नाही. तर, विदेशातून सुद्धा लोक बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी नागपूरात येत असतात. इथं गरीब आणि उपेक्षित लोकांच्या साठी बाबांच्या नावाचा एक दवाखाना बनला पाहिजे आणि लोकांची तिथे सेवा झाली पाहिजे असे ते उपस्थित भाविकांना उद्देशून म्हणाले.
ताजुद्दीन बाबा यांच्या 103 वा उर्स ला 18 जुलैपासून सुरुवात झालेली आहे. देशभरातून आणि विदेशातून अनेक भाविक बाबा ताजुद्दीन यांच्या दर्शनासाठी नागपूरला पोहचलेले आहे. हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या कार्यालयातून मंगळवारी 22 जुलैला संदल रॅली काढण्यात येणार आहे. संदल ताजबागच्या बुलंदर इथून निघाल्या नंतर उमरेड रोड, शीतला माता मंदिर, सक्करदरा चौक, अशोक चौक पासून, महाल, इतवारी, गांधीबाग हयातीत असताना ज्या मार्गाने ते चालत गेले त्याच मार्गाने संदल जाणार आहे.
उर्स म्हणजे काय?
उर्स हा धार्मिक सोहळा सुफी संतांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केला जातो. या कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होऊन आपली श्रद्धा बाबांच्या प्रति व्यक्त करीत असतात. नागपूर मध्ये संतांच्या पुण्यतिथी निमित्त भाविक संदल आणि कव्वाली यांचं आस्वाद घेत असतात. या दिवशी लोक बाबांच्या भेटीला जाऊन त्यांच दर्शन घेत असतात.
दरवर्षी प्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन होत असून, मोठ्या संख्येने भाविक या उर्सला हजर राहत असतात. प्रशासन देखील त्यांच्या व्यवस्थेसाठी फार मेहनत घेत असते.
ताजुद्दीन बाबा आहेत कोण?
ताजुद्दीन बाबा यांचे नाव सय्यद ताजुद्दीन मोहम्मद बद्रुद्दीन चिश्ती असे आहे. ताजुद्दिन बाबा म्हणून ते देशभरात प्रसिद्ध आहेत. ताजुद्दीन बाबा नागपूरमधील एक प्रसिद्ध सुफी संत होते, ज्यांना 'शहंशाह-ए-हफ्त-अकलीम' म्हणजे 'सात खंडांचा सम्राट' म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म नागपुरातील कामठी येथे झाला.
मंगळवार ला निघणार शाही संदल
103 वा उर्स मंगळवारी साजरा करण्यात येणार असून, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट कार्यालयातून शाही संदल ची सुरुवात होणार आहे.


0 टिप्पण्या