पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रथम पाऊल उचलणाऱ्या समाजसेविका एड. वर्षा देशपांडे यांना "आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार २०२५" प्रदान करण्यात आला. "जागतिक लोकसंख्या दिन" च्या औचीत्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. "लेक लाडकी" या अभियानाच्या निमित्ताने पीसीपी एनडीटी या कायद्याची अंमलबजावणी सातत्याने ते करत असतात. मूळचे ते वर्धेचे असून गेल्या काही वर्षांपासून ते सातारा येथे वास्तव्यास आहेत. दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी, उद्योगपती जे आर डी टाटा, आणि "हेल्पेज इंडिया" या संस्थेला यापूर्वी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
वर्षा देशपांडे आहेत कोण?
1988 ला झोपडीतून समाजकार्याला त्यांनी समाजकार्याच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवास सुरू केल्यानंतर त्यांना अनेक बाबींना तोंड द्यावे लागले. वर्षा देशपांडे पेशाने वकील असून, दलित महिला विकास मंडळ संस्थेच्या वतीने ते गेल्या पस्तीस वर्षापासून महिलांवरील अत्याचार आणि लिंगभेद या विरोधात महत्वपूर्ण लढा देत आहेत. एचआयव्हीग्रस्त ट्रक चालक फिरता वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी त्यांनी विशेष उपक्रम चालवला. स्टिंग ऑपरेशन करत त्यांनी गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या वापर करून जवळपास 180 डॉक्टरांवर कारवाई केली. आजपर्यंत त्यांना 20 पुरस्कार मिळालेले आहेत. लिंगभेद समानता यावी यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेला आहे. याचेच फलित म्हणून त्यांना संयुक्त राष्ट्रा तर्फे "आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले आहे.
पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी
गर्भपात रोखण्यासाठी आणि किशोरवयीन मुलींचे लिंग निवड चाचण्या विरोधात पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करिता त्यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण देशभरात स्टिंग ऑपरेशन घडवून आणले होते. लिंग निवड चाचण्या आणि गर्भपात थांबल्याचे आणि असंवैधानिक कृत्य करणाऱ्यांना कायद्याच्या समोर वाकवण्याची श्रेय ऍड वर्षा देशपांडे यांनाच जाते. पी सी पी एन डी टी कायद्यातील केंद्र तसेच राज्य समितीमध्ये त्यांचा सहभाग आहे.
व्यासपीठावर मराठी भाषेत बोलत साधला जगाशी संवाद
आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित एडवोकेट वर्षा देशपांडे यांनी मराठी बाणा अख्या जगाला दाखवून दिला. व्यासपीठावर त्यांनी मराठी भाषेत अख्या जगाशी संवाद साधला. संवाद साधत असताना ते म्हणाले, "हा सन्मान संपूर्ण जगभरातील देशातील आणि राज्यातील लोकांच्या प्रश्नांसाठी, लोकांच्या सोबत राहून, त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या आणि त्यांच्यासाठी संघर्ष करनाऱ्या सर्व संघटनांमध्ये काम करणारे त्यांच्या संघर्षासाठी होतोय अशी माझी धारणा आहे."
"संयुक्त राष्ट्रांनी जपलेल्या मूल्यांचे आणि तत्वांचे समता, शांती आणि मानवी प्रतिष्ठा विशेषतः उपेक्षित आणि असुरक्षित लोकांच्या हक्कांच्या सुरक्षिततेसाठी मी त्यांच्यासोबत राहण्याची ग्वाही देते" असे त्या म्हणाल्या.
महत्त्वाचं म्हणजे त्यांनी इंग्रजी मध्ये न बोलता आपल्या मातृभाषा मराठीत बोलल्या. मराठी बाणा काय असतो दाखवून दिलं.



0 टिप्पण्या