वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला चंद्रा बारोत यांनी घेतला अखेरचा श्वास
1978 साली प्रदर्शित झालेल्या डॉन या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बरोट यांनी वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईच्या वांद्रे येथील रुग्णालयात दुखद निधन झाले. मागील सात वर्षापासून ते फुफ्फुसाच्या फाब्रोसिस आजाराने त्रस्त होते. त्यांना जसलोक रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. प्रकृती बरी होत नसल्याने, त्यांना तिथून हलवून गुरुनानक रुग्णालय येथे डॉक्टर मनीष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार पद्धती सुरू करण्यात आली. दिग्दर्शक चंद्रा बरोत यांच्या निधनाने बॉलीवूड वर शोक काळा पसरली असून, त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे. आज रविवारी त्यांच्या निधनाची महिती त्यांच्या पत्नी दीपा बारोट यांनी माध्यमांना दिली.
त्यांनी निर्माण केलेल्या डॉन या चित्रपट पाहण्यासाठी लोक आजही उत्सुक दिसतात. "पूरब और पश्चिम", "यादगार" आणि "शोर" या चित्रपटात त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे. पूरब और पश्चिम मध्ये त्यांनी जाने माने कलाकार व दिग्दर्शक मनोज कुमार यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे. डॉन चित्रपटात त्यांनी अभिनेता म्हणून इंडस्ट्रीचे बिग बी म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांना संधी दिली. 1978 च्या काळात प्रदर्शित झालेला डॉन हा चित्रपट फार गाजला.
बॉलीवूड अभिनेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
सिने अभिनेते फरहान अख्तर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली व्यक्त करत असताना म्हणाले, "OG डॉन यांचे निधनाची वार्ता मिळाली, चंद्रा बारूत यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि माझ्या संवेदना कुटुंबासमवेत आहेत".
फिल्म सृष्टीचे बिग बी म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या टम्बलर ब्लॉग पोस्टवर लिहीत श्रद्धांजली वाहिली," प्रिय प्रिय मित्र, चंद्र मारुती यांचे निधन झाल्याची बातमी आज सकाळीच कळली. त्यांच्या जाण्याने झालेलं नुकसान शब्दात सांगू शकत नाही. आम्ही एकत्र काम केलं आणि तो इतरांपेक्षा जास्त कौटुंबिक मित्र होता. मी त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करू शकतो."
प्रदर्शित न झालेले चित्रपट
चंद्र मारुती यांनी दिग्दर्शित केलेला डॉन चित्रपट गाजल्यानंतर त्यांनी बरेच चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांचे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालेले नव्हते. "हॉंगकॉंग वाली स्क्रिप्ट" आणि "नील को पकडना इम्पॉसिबल" दोन चित्रपट त्यांचे प्रदर्शित कधीच झाले नाही.

0 टिप्पण्या