मान्सून सत्रात विपक्ष सरकारला कोणत्या मुद्द्यांवर जाब विचारणार जाणून घ्या.
संसदेचे मान्सून सत्र 21 जुलै ते 21 ऑगस्ट पर्यंत होणार असून, विपक्षी दलाने सरकारला जाब विचारण्यासाठी चे नियोजन करण्यासाठी इंडिया आघाडी ने शनिवारला ऑनलाइन बैठक बोलावली . या बैठकीचे आयोजन काँग्रेस तर्फे करण्यात आले . 18 पक्षाचे 24 नेते बैठकीला उपस्थित होते. सर्व पक्षांनी मुद्दे मांडले परंतू, आठ मुद्द्यांवर सर्व इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी सहमती दर्शवली. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार पंतप्रधानांना स्वतः संसदेच्या मान्सून सत्रात उपस्थित राहून आघाडीने विचारलेल्या प्रश्नांना जाब द्यावा लागेल असं इंडिया आघाडीचे म्हणणं आहे.
ट्रम्प यांच भारता विरोधी स्टेटमेंट
भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम दिलं असल्याचं बोलले होते त्याला अनुसरून विरोधी पक्षाने सरकारला जाब विचारणे खूप महत्त्वाचे आहे असं विरोधी पक्ष समजत असून, सरकारचे परराष्ट्र धोरण चुकीचं आहे असा त्यांना वाटू लागले आहे.
पहलगाम येथे घडलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारला जशास तसे उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर नावाचे अभियान दहशतवाद्यांच्या विरोधात चालवले होते. त्या दरम्यान ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याची घोषणा केली. त्या विरोधात मागच्या संसद सत्रामध्ये विरोधी पक्षाने आवाज उठवला होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात नरेंदर सरेंडर अशा शब्दात टीकाटिप्पणी केली होती. पहलगाम हल्ल्यातील डोकं कुणाचं? ते सापडले का नाही? याचं उत्तर मागविणार असल्याचं सांगितलं जातंय.
बिहार येथे वाढत चाललेली गुन्हेगारी
बिहार येथे भाजप सरकार आल्यापासून गुन्हेगारी अजून वाढत चालली आहे. वाढत चाललेली ही गुन्हेगारी फार चिंतेची बाब असून, विपक्ष यावर संसदेत जोरदार आवाज उचलणार असल्याचे बोलले जात आहे. बिहार येथे मतदानाशी संबंधित उपस्थित होनारे प्रश्न यावर सुद्धा चर्चा करण्यात आली.
इंडिया आघाडीच्या ऑनलाईन बैठकीला उपस्थित पक्ष आणि नेते :-
१. काँग्रेस:- सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश, के. सी. वेणुगोपाल.
२. जे एम एम:- माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन
३. समाजवादी पार्टी:- रामगोपाल यादव
४. आर जे डी. :- तेजस्वी यादव
5. एनसीपी :- शरद पवार
6. शिवसेना. :- उद्धव ठाकरे, संजय राऊत
7. टीएमसी. :- अभिषेक बनर्जी
8. सीपीआय(एम) :- एम ए बेबी
९. नॅशनल कॉन्फरन्स :- उमर अब्दुल्ला
10. सीपीआई. :- डी राजा
११. एनसीपी एसपी: शरद पवार
6. शिव सेना यूबीटी: उद्धव ठाकरे, संजय राउत
7. टीएमसी: अभिषेक बनर्जी
8. सीपीएम: एम ए बेबी
10. सीपीआई: डी राजा
11. सीपीआई एमएल: दीपांकर भट्टाचार्य
13. केरल कांग्रेस एम: जोश के मणि
14. आरएसपी: एनके प्रेमचंद्रन
15. डीएमके : तिरुचि शिवा
16. आईयूएमएल: पीके कुन्हलिकुट्टी
17. फॉरवर्ड ब्लॉक: गणेशन देवराजन
18. शेतकारी कामगार पक्ष: जयंत पाटिल
19. वीसीके: थिरुमावलवन
तीन पक्षाचे प्रमुख अनुपस्थित
इंडिया आघाडीतील तीन प्रमुख पक्ष असलेल्या प्रमुख नेत्यांनी स्वतः हजर न राहता त्यांच्या पक्षातील प्रतिनिधींना पाठवले. त्यात प्रामुख्याने नाव म्हणजे टीएमसी चे राष्ट्रीय अध्यक्ष ममता बॅनर्जी, 'डी एम के' चे एम के स्टालिन आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव. बैठक होण्याच्या एक दिवसा अगोदर आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय सिंह जाहीर केलं की,"इंडिया आघाडी ही फक्त लोकसभा निवडणुकीपर्यंत होती त्यानंतर आम्हाला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी निवडणूक लढवावी लागली. आम्ही आता इंडिया आघाडीचे घटक पक्ष नसून आम्ही बाहेर पडत आहोत". आप पक्ष इंडिया आघाडीचा प्रमुख घटक पक्ष मानला जात होता.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ही बहुधा पहिली मीटिंग असावी. आता बघायचं आहे की, मीटिंगमध्ये ठरल्या नुसार मान्सून सत्र सुरू झाल्या नंतर विपक्ष कशाप्रकारे सरकारला जाब विचारते.

0 टिप्पण्या