"सय्याराची बॉक्स ऑफिसवर धमाल" दुसऱ्या दिवशी केली 30 कोटीची कमाई","आमिर, अक्षय आणि सनी देओल यांना टाकलं मागे"

 

     सैयाराने बॉक्स ऑफिस वर केली 30 कोटीची कमाई





          अहान पांडे आणि अनित पड्डा यांचा चित्रपट सैयारा 18 जुलैला चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अंदाजे 21कोटीची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 9.13 ची कामगिरी करत बॉक्स ऑफिस वर ताबा मिळवला. एकूणच दोन्ही दिवशी बॉक्स ऑफिसवर ३०.१३ कोटीची कमाई करत संपूर्ण चित्रपट सृष्टीला हालवून सोडले.
      

     चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळालं. सैयारा चित्रपटाची दिग्दर्शक मोहित सुरी असून, यशराज फिल्म्स चित्रपट निर्माते आहेत. मोहित सुरी यांच्यासाठी ही सर्वोत्तम ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, अहान पांडे आणि अनित पड्डा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. सैयारा या वर्षातील चौथा (ओपनर) चित्रपट ठरला असून, छावा, सिकंदर, हाऊसफुल 5 या तीन चित्रपटानंतर सैयारा चा नंबर लागतो.

     



      द इंडियन एक्सप्रेस च्या वृत्तानुसार, पहिल्या दिवशी 7000 चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 45 कोटी रुपयांमध्ये हा चित्रपट तयार झाला आहे.

         सैयाराने अनेक वर्ष चित्रपट सृष्टीत काम करत असणाऱ्या मोठमोठ्या चित्रपट निर्मात्यांना तसेच कलाकारांवर मात केली. त्यामध्ये प्रामुख्याने अजय देवगन चा "रेड टू", सनी देओलचा "जाट",अक्षय कुमार चा "स्काय फोर्स", आमिर खान चा "सितारे जमीन पर" चित्रपटांना मागे सोडले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या