"वॉर २" च्या "ट्रेलरला सेन्सर बोर्डाने दिली मंजुरी","ऋतिक रोशन दिसणार मुख्य भमिकेत"

 

        



       या वर्षीची चर्चेत आणि अनेक दिवसांपासून चाहत्यांना प्रतिक्षेत ठेवणारा वॉर-२ चित्रपटाच्या ट्रेलर ला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने मंजूरी दिली आहे. चित्रपटाचे ट्रेलर 2 मिनिट 39 सेकंदाचे आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेट ने U/A16+ सर्टिफिकेट दिलं. या चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता फार वाढत आहे. चित्रपटात मुख्य भूमिका सिने अभिनेते ऋतिक रोशन यांची आहे. पहिल्यांदा दक्षिणात्य अभिनेते ज्युनिअर एन. टी. आर. बॉलीवूड मध्ये काम करणार असून यांचीही भूमिका चाहत्यांना बघायला मिळेल. एनटीआर चित्रपटात ऋतीक रोशन यांच्या विरुद्ध दिसणार आहेत. जवळपास 24-25 जुलै ला चित्रपटाचे ट्रेलर ऑनलाईन प्रदर्शित होणार असल्याची माहिती माध्यमांकडून मिळत आहे.

    स्पाई युनिवर्स चा सहावा चित्रपट

     वॉर 2 चे दिग्दर्शक अयान मुखर्जी आहेत. तर निर्माते आदित्य चोपडा आहेत. पहिल्यांदा दक्षिणात्य अभिनेते ज्युनिअर एनटीआर बॉलीवूड मध्ये दिसणार आहेत. वॉल टू यशराज फिल्म च्या स्पाई युनिव्हर्स ची सहावा चित्रपट आहे. 2019 मध्ये आलेल्या वॉर चित्रपटाचा दुसरा भाग आहे.

           14 ऑगस्ट ला होणार रिलीज

        चित्रपट हिंदी, तेलगू आणि तमिळ भाषेमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपटात मुख्य भूमिका बजावलेल्या कियारा आडवाणी पोस्ट शेअर करत म्हणाले.
         

    वॉर-२ ची स्पर्धा रजनीकांत यांच्या कुली चित्रपटा सोबत होणार आहे. एकूणच स्वातंत्र्य दिनाचा पूर्ण आठवडा चाहत्यांसाठी साठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता बघायचं हे आहे की बॉक्स ऑफिस वर रजनीकांत यांचा कूली आणि वॉर -२ कलेक्शन किती करतात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या