इंडिया आघाडी शी युती केवळ लोकसभा निवडणुकी पर्यंत होती, त्यानंतर हरीयाणा आणि दिल्ली राज्यात आम्ही वेगवेगळे लढलो असून, पंजाब आणि गुजरात मधील पोटनिवडणूक वेगळी लढवली. बिहार मधील निवडणूक आम्ही एकटे लढणार असून, आम्ही इंडिया आघाडी मधून बाहेर पडत असल्याची घोषणा आपचे राष्ट्रीय प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी शुक्रवारला केली.
काँग्रेस ला धरले निशाण्यावर
काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. परंतु, लोकसभा निवडणूक झाल्या नंतर काँग्रेसने एकदाही मीटिंग किंवा कुठलीही चर्चा केली नाही. इतकंच नाही तर सर्वांना सोबत घेऊन चालण्यासाठी पाऊल सुद्धा उचलेलं नाही. पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीचा विस्तार करण्यासाठी सुद्धा पाऊल उचललं गेलं नाही.
आम आदमी पक्षाने भूमिका स्पष्ट केली
आम आदमी पार्टी ही मजबूत विपक्ष भूमिका बजावत राहणार असून, पुढे होणाऱ्या संसद सत्र मध्ये संपूर्ण मुद्दे उचलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पहलगाम येथे हल्ला करून, भगिनिंच्या माथ्या वरील कुंकू पुसणारे चार दहशतवादी कुहे आहेत यासारखे अनेक प्रश्न मांडणार असल्याचे प्रसार माध्यमांवर सांगितले. आम्ही लोकसभा निवडणूक इंडिया आघाडी सह लढवली. नंतर विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढवली असून, इंडिया आघाडीतून बाहेर पडत असल्याचे सांगीतले.
लोकसभा निवडणूक हरल्यापासून पहिली बैठक
इंडिया आघाडीची लोकसभा निवडणूक हरल्यापसून एकही बैठक झाली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी त्यांना इंडिया आघाडीतील बैठकी बाबत विचारले असता , राष्ट्रीय युतीबाबत भूमिका जाहीर केली. जवळपास 13 महिन्यांनी ही बैठक होत आहे. सोमवार पासून मॉन्सून सत्र सुरू होत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती काय यावर विचार विनिमय करण्या साठी ही मीटिंग आयोजित केली जाणार आहे. 19 जुलैला इंडिया आघाडी ची लोकसभा निवडणूक हरल्यानंतर पहिल्यांदा बैठक होणार आहे.

0 टिप्पण्या