अक्षय कुमार धावले स्टंट मॅन च्या मदतीसाठी !!!
खिलाडियो के खिलाडी म्हणून परिचित असलेले अक्षय कुमार यांनी स्टंट मॅन आणि स्टंट वूमन यांच्या सहकार्य करिता त्यांनी देशातील जवळपास 650 ते 700 शूटिंग स्टंटमॅन आणि स्टंट वूमन साठी हेल्थ आणि एक्सीडेंट कव्हर इन्शुरन्स वर खर्च करणार असल्याची माहिती परिचित ॲक्शन डायरेक्टर विक्रम सिंग दहिया यांनी माध्यमांना दिली. 13 जुलै ला दक्षिणात्य दिग्दर्शक पा.रंजीत यांच्या तामिळ चित्रपट "वेत्तुवाम" शूटिंग दरम्यान अनुभवी स्टंटमॅन एस एम राजू मोठी जोखीम असलेली कार चालवत स्टंट करत असताना दुःखद निधन झालं.
कोण आहेत विक्रम सिंग दहिया?
विक्रम सिंग दहीया हे प्रोफेशनल स्टंटमॅन असून, ओ एम जी२, धडक आणि जिग्रा या चित्रपटामध्ये त्यांनी स्टंटमॅन म्हणून काम केलं आहे. ते एक अनुभवी स्टंटमॅन आणि नावाजलेले आहेत
स्टंट व्यवसायकांसाठी उचललेलं महत्त्वाचा पाऊल
मनोरंजन विशेषतः स्टंट मॅन किंवा स्टंट वूमन यांच्यासाठी केलेली ही कामगिरी फार महत्त्वाची आहे. त्यांच्यामुळे अनेक स्टंटमॅन आणि स्टंट वूमन यांच्या परिवारांना एक आर्थिक सहकार्य होईल, यासाठीही उचलेलं महत्त्वाचं पाऊल आहे. या पॉलिसीमध्ये हेल्थ आणि एक्सीडेंट इन्शुरन्स सह सेटवर किंवा सेटच्या बाहेर पाच ते साडेपाच लाखापर्यंतच्या मोफत उपचाराचा समावेश आहे. स्टंटमॅन किवा स्टंट वूमन यांचं काम फार जोखीमेचं असतं.
ॲक्शन डायरेक्टर म्हणाले
ॲक्शन डायरेक्टर विक्रम सिंह दहिया यांनी सिने अभिनेते अक्षय कुमार यांचे आभार मानत म्हणाले, "जवळपास साडेसहाशे स्टंट मॅन आणि स्टंट वूमन यांनी या विमा पॉलिसी चा लाभ घेतलेला आहे".

0 टिप्पण्या