मोहम्मद शमी मुलीच्या जन्मदिनी झाला भावुक", "पोस्ट शेअर करत दिल्या सदिच्छा"

 




भारतीय क्रिकेट संघाचे वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद शमी यांनी मुलीच्या 10 व्या वाढदिवशी समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांची मुलगी आजच्या दिवशी दहा वर्षाची झाली असून, शुभेच्छा देत असताना ते फार भावुक झाले. मुलगी आयरा ही तिच्या आईसोबत कोलकाता येथे राहते. मोहम्मद शमी यांनी ही पोस्ट तेव्हा केली जेव्हा दोघेही एकमेकांपासून वेगळे झालेत आणि दोघांमध्ये कायदेशीर लढाई चालू आहे.

            

            


                        भावुक होत दिल्या शुभेच्छा

मोहम्मद शमी यांनी समाज माध्यमांवर आयरा सोबत पोस्ट शेअर करत त्यांच्या मनातील मुली विषयी प्रेम समाज माध्यमांवर दाखवून दिले. समाज माध्यमांवर लिहित असताना म्हणाले "प्रिय मुली, मला अजूनही आठवते त्या सर्व रात्री, आम्ही हसत बोलत जागा राहिलो आणि विशेषतः तुझं नृत्य .विश्वासच बसत नाही की तू लवकर मोठी होत आहेस. मी तुला आयुष्यात फक्त शुभेच्छा देतो. देव तुला आज आणि नेहमीच प्रेम, शांती, आनंद आणि चांगले आरोग्य देवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा". इंग्रजी मध्ये त्यांनी पोस्ट लिहत सदिच्छा दिल्या.

               

                 


       

                 पत्नी सोबत झाला घटस्फोट

गेल्या काही वर्षापासून क्रिकेटर मोहम्मद शमी यांचा जीवन फार अडचणीचं झालेलं आहे. त्यांची पत्नी हसीन जहा आणि मोहम्मद शमी हे 2018 पासूनच वेगवेगळे राहायला लागले. त्यांची मुलगी ही त्यांच्या पत्नी सोबत राहत असून, 2018 पासून त्यांची त्यांच्या मुली सोबत भेट नाही. त्यांची पत्नी हसीन जहा यांनी 2018 मध्ये त्यांच्या परिवाराच्या विरुद्ध हुंडा छळ आणि घरेलू हिंसा या विरुद्ध एफ आय आर नोंदवले. सोबतच असाही आरोप लावला की मला आर्थिक स्वातंत्र्यापासून थांबवलं गेलं. या प्रकरणात कोलकाता हायकोर्टाने चार लाख रुपये महिना भत्ता देण्याचा आदेश दिला.

                     चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

क्रिकेटर मोहम्मद शमी यांनी पोस्ट करताच का काही तासात चाहत्यांनी शुभेच्छांच्या वर्षाव केला. काहींनी वाढदिवसाच्या सदिच्छा म्हणत सदिच्छा दिल्यात, तर "बेटी बाप की आँख तारा, जिस पर उसने सबकुछ वारा छोड चले बाबुल का घर, जब वह लम्हा एक कयामत है", " हॅपी बर्थडे डिअर आयरा, अल्ला ब्लेस यु" म्हणत चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या