बाप लेकीच्या नात्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ मध्ये मुलगी आजारी असून, उपचार घेत असताना कंटाळा आला असल्याने वडिलांच्या कृतीने तिच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहेत.
"लेक ही बापाच्या हळव्या मनातली लक्ष्मी" अशी आपल्याकडे जुनी म्हण आहे. बाप लेकीचं नातं हे जगा वेगळं असून, लेकीच्या चेहऱ्यावरील हास्य बघणे प्रत्येक वडिलांसाठी आनंददायी क्षण असतो. असाच एका बाप लेकीचा दवाखान्यातील व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय.
व्हायरल व्हिडिओ मध्ये लहान मुलगी आणि तिचे वडील दवाखान्यात उपचार करण्यासाठी दाखल झालेले असून, मुलगी बेडवर झोपलेली दिसते. तिच्या हाताला सलाईन आणि आजुबाजूला वैद्यकीय उपकरणं आहेत. सुरू असलेल्या सततच्या उपचारामुळे ती मानसिक नैराश्यात असल्याचे दिसते.
आपल्या मुलीचे मन रमवण्यासाठी तिच्या वडिलांनी एक उपाय शोधला. ज्यामध्ये तिचे वडील तिच्या समोर बुडबुडे उडवायला लागतात. ज्यामुळे ते बुडबुडे संपूर्ण खोलीत उडायला लागतात. नंतर तिचे वडील तिला बुडबुडे उडवायला लावतात. तेव्हा तिचे नैराश्य दूर होऊन चेहऱ्यावर हसू फुलायला लागतो.
वडिलांच्या या कृतीमुळे आजार आणि वेदना या सर्वांवर बाप लेकी काही क्षणासाठी विजय मिळवत असताना दिसतात.
काय आहे नेटकऱ्यांची प्रतिक्रिया?
एक जण लिहितो, "हा खरोखरच एक हृदयस्पर्शी क्षण आहे. आजारपणात वडिलांचे हास्य आणि उपस्थिती यावरून दिसून आले की औषधां सोबतच प्रेम आणि विश्वास देखील उपचारांचा एक भाग आहे. कधीकधी, पालकांचा आधार ही सर्वात मोठी ताकद बनते." तर, एकाने लिहिलं,"वडील एक मायाळू व्यक्ती असतात. त्यांना त्यांच्या मुलाचं दुःख कधीच सहन होत नसतं."
एक जण म्हणतो, "उपचार सोबत आई_वडिलांचा आशीर्वाद आणि प्रेम आवश्यक असते. अपेक्षा करतो की, मुलीची लवकरच प्रकृती बरी होईल."
व्हायरल व्हिडिओ @Jimmy__02 या एक्स अकाउंट वरून पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडिओला 5, 5523 जणांनी पसंती दर्शवली आहे. तर, 840 जणांनी व्हिडिओ रिपोस्ट केला आहे.
अस्पताल में एक भावुक पल देखने को मिला, जहाँ एक पिता अपनी बीमार बेटी को खुश रखने की कोशिश कर रहा था।
— JIMMY (@Jimmyy__02) January 7, 2026
वह मुस्कुरा रहा था, उससे बातें कर रहा था और उसके पास रहकर उसका हौसला बढ़ा रहा था, लोगों ने महसूस किया कि पिता की मौजूदगी से बच्ची को सुकून मिला।
यह पल दिखाता है कि इलाज के… pic.twitter.com/vZVOrck9At

0 टिप्पण्या