पंजाब येथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने बॉलीवूड कलाकारांनी आर्थिक मदत केली आहे. अक्षय कुमार यांनी सर्वात जास्त आर्थिक सहकार्य केले आहे.
Punjab Flood Victims :-
सध्या देशात पावसाने थैमान घातले असून, अनेक राज्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु, पंजाब राज्यात जलप्रलय ची स्थिती पाहायला मिळत आहे. पंजाब मधील अनेक शेत, घरं पाण्याखाली गेल्याचे व्हिडिओ, समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड स्टार देखील आर्थिक सहाय्य पंजाब मधील पूरग्रस्त भागांतील लोकांना करत आहेत.
अभिनेते अक्षय कुमार यांनी नुकतेच पाच कोटी रुपये पंजाब येथील पूरग्रस्तांच्या मदती करिता दिले आहे. दिव्य मराठीच्या वृत्तानुसार, त्यांनी माध्यमांना सांगितले की, " मी पंजाब पूरग्रस्तांना लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी ५ कोटी रुपये पाठवत आहे. दान देणारा मी कोण? जेव्हा मदतीसाठी संधी येते तेव्हा मी स्वतःला धन्य मानतो. माझ्यासाठी ही सेवा असून, एक छोटेसे योगदान आहे.
याआधीही अक्षय कुमार यांनी कोरोना काळात 25 कोटी रुपये PM केअर फंड ला कारोना विरुद्ध लढण्यासाठी दान दिले होते. त्यामुळे ते आता फक्त पडद्यावरचे हिरो राहिलेले नसून, वास्तविक जीवनातील सुध्दा हिरो झाले आहेत.
यासह बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा यांची आयपीएल टीम पंजाब किंग्स तर्फे ३३.०८ लाख पूरग्रस्तांच्या मदती करिता दिले आहेत.
सिने अभिनेते सोनू सूद यांनी त्यांच्या बहिण मालविका सूद यांना पंजाब मध्ये पाठवून पूरग्रस्तांना लागणारे साहित्य पुरवत आहेत. "गरजूंना कुठल्याही प्रकारची आवश्यकता भासत असेल तर त्यांनी त्वरित सांगावी आम्ही ते पोचविण्याचा प्रयत्न करू " असे आवाहन सोनू सूद यांनी त्यांच्या एक्स वरून केले आहे. सोनू सूद सुद्धा अक्षय कुमार यांच्या सारखेच गरजूंना मदत अनेकदा करताना दिसत असतात.
0 टिप्पण्या