Hot Posts

6/recent/ticker-posts

" पंतप्रधानांनी GST बचत उत्सवाची केली घोषणा " " देशाला पत्र लिहत दिली माहिती "

 

  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू आणि सेवा कर मध्ये सुधारणा घडवून आणले असल्याची माहिती दिली आहे. यामुळे देशभरातील अनेक लोकांना फायदा होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली आहे. 



     Central Govt. Launches GST Reforms :- 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नावे पत्र लिहत नवरात्री सणाच्या सदिच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्यांनी वस्तू आणि सेवा कर (GST) मध्ये मोठा बदल करण्यात आले असल्याची घोषणा सुद्धा केली आहे. याचा देशभरातील लोकांना फायदा होणार असल्याची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. आजपासून म्हणजेच २२ तारखे पासूनच GST सुधारित कर लागू होणार आहे.

  

             





             GST बचत उत्सवाला सुरुवात


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२सप्टेंबर रोजी पुढच्या पिढीतील जीएसटी सुधारणा घडवत. संपूर्ण देशात "GST बचत उत्सव" सुरू केलं आहे. ज्याचा फायदा मध्यमवर्गीय, शेतकरी, महिला, व्यापारी आणि इतर सर्वांना या सुधारित GST चा फायदा होणार आहे.

      सुधारित वस्तू आणि सेवा कराचे वैशिष्ट्य 

सुधारित GST मध्ये आता दोन प्रकारचे स्लॅब असणार आहेत. सुधारित नवे GST दर ५% आणि 18% लागू करण्यात आले आहे. अन्न, औषधे, साबण, टूथ पेस्ट, विमा (Insurance) यापैकी ते एकतर ५% स्लॅब मध्ये त्याचा समावेश होणार किंवा कर मुक्त (Tax Free) होणार. पूर्वी ज्या वस्तूंवर १२% कर लावला जायचा आता ते ५% करण्यात आले आहेत. हेल्थ इन्शुरन्स वर पण आता शून्य टक्के GST आकारल्या जाणार आहे.
            

          २५ कोटी लोक गरिबीतून बाहर पडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नागरिक देवो भव हा आमचा मंत्र असून, या ११ वर्षात आमच्या सरकारने २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहेत. देशात सध्या एक निओ मिडल क्लास तयार झाला आहे. आता यांना अजून मजबूत बनवल्या जाणार आहे. १२ लाख पर्यंतच्या मिळकतीवर (Income) आता कर आकारल्या जाणार नाही आहे. Income Tax मधील सवलत आणि सुधारित GST ला मिळवून बघितलं. तर, वर्षाला देशवासीयांचे २.५ लाख कोटी वाचतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या