Hot Posts

6/recent/ticker-posts

" जॅकलिन फर्नांडिस ची मनी लाँडरींग प्रकरणातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली "

 

अभिनेेत्री जॅकलिन फर्नांडिस ची मनी लाँडरींग प्रकरणातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. यामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत. 



Jackline Fernandise Money Laundering Case :- 


नवी दिल्ली:- 

सर्वोच्च न्यायालयाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ची २१५ कोटी रुपयांच्या मणी लाँडरिंग प्रकरणातील याचिका फेटाळून लावली आहे. न्यायाधीश दिपंकर दत्ता आणि न्यायाधीश ए जी मसिह यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे. सुकेश चंद्रशेखर हे सुद्धा या प्रकरणातील आरोपी आहे.

       





        अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांनी ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला स्थगीती देण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यापूर्वी तिने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु, न्यायालयाने ती फेटाळली होती. त्यामुळे तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अंमलबजावणी संचालनालय (ED) च्या चौकशीत हस्तक्षेप करण्यास नकार देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला जॅकलिन फर्नांडिस ने सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले होते. 


          काय आहेत जॅकलिन फर्नांडिस वर आरोप ? 

 ED ने चौकशी दरम्यान जॅकलिन फर्नांडिस वर असे आरोप केले की, " जॅकलिन फर्नंडिस ने ७ कोटी चे भेटवस्तू चंद्रशेखर कडून स्वीकारले, जेव्हा तिला माहिती होतं की चंद्रशेखर हा गुन्हेगारी प्रवृत्ती बाळगतो. चौकशी दरम्यान तिने चंद्रशेखर शी सर्व संबंधांना नकार दिला. सगळे पुरावे समोर आल्यानंतर सर्व आरोप तिने मान्य केले. त्यानंतर आरोपी चंद्रशेखर ला अटक झाली आणि तिने फोन मधील संपूर्ण डाटा मिटवला (Delete). 

 

                काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय? 

आरोपीने तुम्हाला पैसे भेट म्हणून दीले. काहीही सिद्ध झालेले नाही. तुम्हाला आरोप काय आहे ते स्वीकारावे लागेल. कायदा असा आहे की कोणीही यात सहभागी होऊ शकतो हे आम्हाला मान्य आहे. असे समजा, ते दोन खूप जवळचे मित्र होते आणि आता जर एका मित्राने दुसऱ्या मित्राला काही दिले, तर शेवटी जर असे आढळून आले की दुसरी व्यक्ती एखाद्या पूर्वनियोजित गुन्ह्यात सामील आहे, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले.


            


        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या