राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आर्थिक निकषांच्या आधारांवर आरक्षण असायला हवं, असं वक्तव्य केलं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरी समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात समाज माध्यमांवर विरोध दर्शवत आहेत.
VBA Aggressive Against Supriya Sule :-
![]() |
| Photo Source Vanchit Bahujan Aghadi |
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
सुप्रिया सुळे यांनी आरक्षण वर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, " आरक्षण केवळ गरजवंताना दिल्या गेलं पाहिजे. माझे आई वडील आणि मुलं जर शिक्षित असेल आणि मी आरक्षण साठी अर्ज करत असेल तर मला लाज वाटली पाहिजे."
वंचित बहुजन आघाडीचा सुप्रिया सुळे
विरोधात आक्रमक पवित्रा
सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडी चांगलीच आक्रमक झालेली आहे. वंचितने सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, " सुळेंना बाबासाहेबच समजत नाही आणि त्यांनी दिलेलं आरक्षण सुध्दा समजत नाही. आम्ही आरक्षणवादी जीवंत आहोत तोवर तुमचे आरक्षण संपवण्याचे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाही."
सुप्रिया ताई ना बाबासाहेब समजतात, ना त्यांचं दिलेलं आरक्षण!
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) September 21, 2025
बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन आहे आणि शेकडो वर्षं जातीय भेदभाव व वंचिततेला सामोरं गेलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना सशक्त करण्याचं माध्यम आहे.
आरक्षण ही काही गरीबी निर्मूलन योजना नाही!… pic.twitter.com/g3jJuRAWi8
सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्या वरून वंचितने इंडिया आघडीचे घटक पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस ला सवाल केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.
काही दिवसां पूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने मंडल यात्रा काढत सामाजिक आरक्षणाचा समर्थन केलं होतं. आता त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पलटी मारली आहे. आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर शरद पवार गटाच्या वतीने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेस आणि शिवसेना ऊबाठा गट सुद्धा या प्रकरणावर मौन बाळगून आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर अनेक आंबेडकरी समूहातील देशभरातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

0 टिप्पण्या