" तरुणांनो एसटी महामंडळ मध्ये रोजगाराची संधी " " तयारी ला लगा "

 


एसटी महामंडळ मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी तरुण तरुणींना मोठ्या संख्येने संधीचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. 



MSRTC Contract Basis Recruitment :- 

   सध्या देशभरात बेरोजगारीचे चित्र तयार झाले असून, शिक्षित तरुण तरुणी रोजगाराच्या अनेक संधी शोधत आहेत. हीच परिस्थिती राज्यातील सुद्धा आहे. आपल्याला शासकीय नौकरी असावी असे कोणाला वाटणार नाही. अशातच एसटी महामंडळ मध्ये मोठ्या प्रमाणत रोजगार संधी उपलब्ध होणार आहे. भविष्यात शासना तर्फे एसटी खरेदी केल्या जाणार असून, तेव्हा मनुष्य बाळाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळ मध्ये आता हजारोंच्या संख्येने रोजगार भरती केली जाणार आहे, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 






               नेमके किती केली जाणार आहे भरती? 

एसटी महामंडळात १७,४५० जागा चालक व सहाय्यक पदां करिता कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे. २ ऑक्टोबर रोजी निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. एसटी महामंडळ मध्ये ही राज्यातील हजारो तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून, येणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. 


                      किती मिळणार पगार ?

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हि उत्तम संधी आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्याला ३०,००० पर्यंत पगार दिला जाणार आहे. एसटी महामंडळ मध्ये ही संधी केवळ कंत्राटी पद्धतीने ३ वर्षासाठी संधी दिली जाणार आहे. यासाठी ई-निविदा प्रक्रिया ६ प्रादेशिक विभाग निहाय राबविण्यात येणार आहे.

      

      एसटी महामंडळ मध्ये कागदपत्रे कुठली लागतील, वयोमर्यादा आणि अटी काय असेल याबद्दलची खात्रीशीर माहिती मिळलेली नाही. सरकार याबद्दल लवकरच जाहिरात प्रसिद्ध  करेल. 

    


        





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या