Hot Posts

6/recent/ticker-posts

" ७० वर्षापासून काँग्रेस EVM हॅक करत होती, आता आम्ही केलं तर ... " अरविंद केजरीवाल यांचा संताप "

 

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी EVM संदर्भात मोठं वक्तव्य केलेलं आहे. ज्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. यावर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. 



DELHI CM Rekha Gupta Criticises Congress :- 

काँग्रेस चे सर्वेसर्वा राहुल गांधी वोट चोरी च्या मुद्या वरून सरकारला व निवडणूक आयोगाला सतत धारे वर धरत आहेत. याच प्रसंगी आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काँग्रेस वर EVM बद्दल गंभीर आरोप करत टीका केली आहे. ज्यामुळे आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा रेखा गुप्ता यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा EVM हॅक संदर्भातील विडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. 




Photo Source The Asian Age




         मुख्यमंत्री रेखा गुप्ता काँग्रेस वर गरजले


मुख्यमंत्री रेखा गुप्ता ने एनडीटीव्ही चॅनल ला मुलाखत दिली. त्या दरम्यान त्यांनी EVM संदर्भात वक्तव्य करत काँग्रेस वर निशाणा साधला. राहुल गांधींनी अनेकदा वक्तव्य केले, " बिजेपी वोट चोरी करून सत्तेत बसली." त्यावर उत्तर देताना रेखा गुप्ता म्हणाल्या, " देशात ७० वर्षापासून काँग्रेस ने EVM हॅक करत निवडणुका जिंकल्या आहेत. परंतु, आम्ही निवडणुका जिंकलो तर वाईट वाटायला लागलं तुम्हाला. काँग्रेस ने निवडणुका जिंकल्या तर जनतेचा आदेश आणि भाजप जिंकली तर EVM हॅकिंग हा फॉर्म्युला कुठल्या पुस्तकातून येतो हे कोणी मला सांगणार का?" अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली.

     

  अरविंद केजरीवाल यांची रेखा गुप्ता वर टीका


आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी EVM संदर्भात रेखा गुप्ता यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना एक्स वर व्हिडिओ पोस्ट करत टीका केली आहे. ते म्हणाले, "दिल्लीची मुख्यमंत्री हे काय बोलत आहेत." 



 

   आता या प्रकरणात काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

       



   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या