महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने च्या लाभार्थ्यांना दोन महिन्यात E-KYC करण्याचे आदेश दिले आहेत. कसा कराल E-KYC जाणून घ्या.
Majhi Ladki Bahin Yojna E-KYC :-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांसाठी राबवली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. या योजनेचे अनेक महिला सध्या लाभ घेत आहेत. महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम कसे होतील यासाठी ही योजना कार्यरत आहे. सरकारने आता या योजनेच्या लाभार्थ्यां ना दोन महिन्यात E-KYC पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली.
![]() |
| Photo Source IBC24.in |
कुठे कराल E-KYC ?
लाभार्थ्यांनी E-KYC चा अर्ज ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला (वेबसाईट) ला भेट देऊन करायचा आहे.
काय आहे E-KYC करण्याची संपूर्ण प्रक्रिया ?
वर नमूद केलेल्या संकेत स्थळी भेट दिल्या नंतर E-KYC करण्यासाठी मुखपृष्ठ (Home Page) वर तुम्हाला E-KYC च ऑप्शन दिलेले . त्या ऑप्शन ला क्लिक केल्या नंतर लाभार्थ्यांना आधार क्रमांक व Captcha फॉर्म भरताना नमूद करावयाचा आहे. नंतर send OTP ऑप्शन वर क्लिक करायचा आहे. नंतर E-KYC पृष्ठावर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नमूद करून captcha भरावा. परंतु, आई वडिलांच्या किंवा नवऱ्याचा आधार कार्ड शी मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. नंतर Send OTP ऑप्शन वर क्लिक करावा. मिळालेला OTP नंबर नमूद करून, फॉर्म सबमिट करावा.
यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्गाची निवड करायची आहे. जर तुमच्या कुटुंबातील सदस्य सरकारी आजी माजी कर्मचारी आहेत का? याची निवड तुम्हाला करावी लागणार आहे आणि माझ्या घरातील १ विवाहित आणि १ अविवाहित महिला लाभ घेत आहे, होय अथवा नाही याची निवड करून डीक्लरेशन म्हणून साईटला सबमिट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची E-KYC पूर्ण झाल्याचा संदेश तुमच्या मोबाईल वर येईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 18, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://t.co/gBViSYZxcm या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत…

0 टिप्पण्या