Hot Posts

6/recent/ticker-posts

" मंत्रालयात प्रवेशासाठी आता लागणार ऑनलाइन पास " " यासाठी काही ओळखपत्र सादर करायचे आहे "



आता मंत्रालयात जाण्यासाठी रांगेत उभं राहून त्रास सहन करण्याची गरज नाही. सरकारने ऑनलाइन पास ची व्यवस्था तयार केली आहे. 



Mantralay Pass Online :- 

कुठल्या ना कुठल्या कामा निमित्त मंत्रालयात जावे लागते. त्यामुळे विविध कामांच्या निमित्ताने मंत्रालय गाठणे आता अधिक सोपं होणार आहे. आता पास साठी रांगेत उभं राहण्याची पद्धत बंद होणार असून, ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. ज्यासाठी अभ्यागतांना काही कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. आता मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिये तर्फे एका क्लिक वर पास मिळणार आहे. 



Photo Source News sd



      

          कुठल्या ॲप वर करावी लागणार नोंदणी ? 


      काही कामानिमित्त मंत्रायलायात जाण्यासाठी आता सरकारने रांगेत उभे राहण्याची पद्धत बंद करणार असून, डिजी प्रवेश ॲप (DIGI Pravesh App) वर नोंदणी करून मिळणाऱ्या क्यूआर कोड नुसारच मंत्रालयात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पूर्वी कुठल्याही कारण सांगून मंत्रालयात जाण्याचा नियम होता. तो नियम आता यापुढे लागू होणार नाही. 


                  सादर करावयाचे ओळखपत्र ? 


आता मंत्रालयात येणाऱ्या सर्वांसाठी डिजि प्रवेश ॲप वर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहेत. यासाठी लागणारे कागदपत्रे आधार कार्ड, वाहन परवाना आणि पॅन कार्ड इत्यादी शासनमान्य ओळखपत्र अभ्यागतांना सादर करावयाचा आहे. 

   अभ्यागतांना ज्या विभागात कामा बद्दल पास मिळाला आहे त्याच विभागात दिलेल्या वेळात काम पूर्ण करावे व मंत्रालयातून बाहेर पडावे. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास कारवाई केली जाणार आहे. दुपारी दोन नंतर सर्व अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे. 

                

                        कशी कराल नोंदणी ? 

डिजी प्रवेश ॲप मध्ये नोंदणी गरजेची केली असून, त्यासाठी Digi Pravesh App अँड्रॉइड मोबाईल साठी प्ले स्टोअर आणि आयफोन वापरत असाल तर आयओएस ऍपल स्टोअर, वरून डाउनलोड करणे आवश्यक आहे. या ॲप वर नोंदणी करावी. नंतर, आधार क्रमांकावर आधारीत यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर, ज्या विभागात अभ्यागतांना काम असेल, त्या विभागाची परवानगी आणि वेळ अभ्यागतांना दिली जाणार आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेल्या प्रवेशास पात्र ठरतील. 

 


              



       

        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या