Hot Posts

6/recent/ticker-posts

" राजुरा मतदारसंघातील मतचोरी वरून काँग्रेस भाजप मध्ये जुंपली " " माजी आमदार वामनराव चटप यांनी मतचोरी विरोधात भाष्य केले "

 

काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत राजुरा मतदारसंघातील मतांच्या गैरव्यवहार प्रकरणी भाष्य केले. आता काँग्रेस भाजप मध्ये यावरून टीका टिपण्णी पाहायला मिळत आहे. 



Congress Criticises BJP :- 


लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी १८ तारखेला पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग वर गंभीर आरोप केले. कर्नाटक राज्यातील आलंद मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील चंद्रपुर मधील सहा मतदारसंघा पैकी एक राजुरा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यावरून आता आजी आणि माजी आमदार आरोप प्रत्यारोप करू लागले आहेत. 

               राहुल गांधींच्या काल झालेल्या पत्रकार परिषद नंतर काँग्रेसचे राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी या प्रकरणी वक्तव्य केले आहे. 

           







                        सुभाष धोटे म्हणाले, 


" राजुरा मतदारसंघा बाबत राहुल गांधींनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर आम्ही खेडे गावात भेटी देऊन, या प्रकरणाची चौकशी केली. गडचांदुर मध्ये १६०० मतं जास्तं आढळले. तर, राजुरा तालुक्यात आम्हाला अंदाजे १५०० मतं जास्त आढळले. ६,८५३ बोगस मतं असताना हे मतं डिलीट केले. ज्या व्यक्तीने ही मतं नोंदवली त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केलेली नाही." 


       भाजपचे राजुरा मतदारसंघाचे विद्यमान आमदार देवराव भोंगळे वोट चोरी प्रकरणात भाष्य केले आहे. 

    

                 

         आमदार देवराव भोंगळे  म्हणाले,

 

 " मतदारसंघातील कुणाचेही नाव मतदार यादीतून गायब झालेले नाही. परंतु, त्या संदर्भात निवडणूक आयोग अधिकृत माहिती जाहीर करेल."


        या प्रकरणी राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार व शेतकरी नेते वामनराव चटप यांनी सुद्धा मतचोरी विरोधात वक्तव्य केलेले आहे. 

              

                  ॲड. वामनराव चटप म्हणतात, 


  " साधारणपणे २०,००० मतदार बोगस नोंदवले गेले. त्यापैकी ६,७५० मतं तक्रारी नंतर कमी करण्यात आले. राजुरा तहसीलदार यांनी याप्रकरणी गुन्हा सुद्धा नोंदवला. ऑनलाईन नोंदणी झाल्या नुसार कोणाच्याही आधार नंबर चा समावेश नाही. त्यामुळे सगळे मतदान बोगस ठरतात. यामुळे राजुरा मतदारसंघातील निवडणूक रद्द होण्यास पात्र आहे."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या