Hot Posts

6/recent/ticker-posts

" सर्व धर्मांचा आदर करतो सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले "

 


सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्य प्रदेश राज्यातील  खजुराहो मंदिरातील भगवान विष्णू संदर्भात केलेल्या टिप्पणी वरून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 



CJI Bhushan Gawai Criticises On Lord Vishnu:- 


सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्य प्रदेश राज्यातील खजुराहो मंदिरातील भगवान विष्णू यांच्या मूर्ती बद्दल विधान केले होते. ते विधान समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यामुळे अनेक हिंदू धर्मातील महंतांनी त्यांच्या विरोधात टीका केली होती. आता या प्रकरणात त्यांनी मी सर्व धर्माचा आदर करतो म्हणत भूमिका स्पष्ट केली आहे. 




Photo Source The Leaflet 




                               काय आहे प्रकरण? 

   मध्य प्रदेशच्या खजुराहो मंदिरातील भग्नावस्थेतील सात फूट उंच भगवान विष्णूची मूर्ती पुननिर्मित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई याचिका फेटाळत विरोधाभासी विधान दिलं होतं. त्यांचा हा विधान समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झालं. 


                       काय केली होती टिप्पणी ? 

या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश भूषण गवई आणि ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांनी सुनावणी करण्यास नकार दिला होता. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, " हा विषय न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नसून, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यातील आहे. तेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर समर्थक आहोत असे म्हणता. तर मग त्यांच्याकडेच जाऊन प्रार्थना करा." असे विधान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. 

       सरन्यायाधीश भूषण गवई यांनी विधान करताच समाज माध्यमां वर चांगलीच व्हायरल झाले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सरन्यायाधिशांच्या समर्थनात येत, त्यांनी निरीक्षण नोंदवले. "सोशल मीडियावर अनेकदा घटनां वरील प्रतिक्रिया प्रमाणाबाहेर वाढतात."

        सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या या विधानाचे काहींनी समर्थन केले तर अनेकांनी विरोध दर्शवला. हिंदू महंतांनी तर त्यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव ठेवण्याची विनंती केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या